Anant-Radhika Pre Wedding: सध्या संपूर्ण अंबानी (Ambani Family) कुटुंबिय हे गुजरातमधील जामनगरमध्ये आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) यांच्या प्री वेडिंगच्या कार्यक्रमांचे सेलिब्रेशन सध्या सुरु आहे. 1 मार्चपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झालीये. सध्या जामनगर, गुजरातमध्ये बिल गेट्स, पॉप सिंगर रिहाना, मार्क झुकरबर्ग यांच्यासह अनेक  दिग्गज मंडळीही उपस्थित आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील सर्व मोठे स्टार्सही जामनगरमध्ये जमले आहेत. या सगळ्या पाहुण्यांची अंबानी कुटुंबियाने पाहुण्यांच्या राहण्याची रॉयल सोय केलीये. 


दरम्यान अंबानी कुटुंबियांनी त्यांच्या सगळ्या पाहुण्यंची राहण्याची सोय तंबूत केली असल्याची माहिती समोर आली होती. पण ही तंबूतली सोय फाईव्ह स्टार हॉटेल्सला देखील लाजवेल अशी आहे.  माजी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अंबानी कुटुंबियांकडून पाहुण्यांसाठी करण्यात आलेली ही सोय पाहायला मिळत आहे. ही सेलिब्रिटींची खास सोय कशी आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


राधिका-अनंतच्या प्री-वेडिंग व्हेन्यूचा व्हिडिओ व्हायरल


सायना नेहवालने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'परफेक्ट अंबानी वेडिंग.' सायना नेहवालने सेलिब्रिटी पाहुण्यांसाठी राहण्याची व्यवस्था केलेल्या ठिकाणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे सर्व तंबू जवळच लावण्यात आले असून येथे तुम्हाला संपूर्ण देसी शैली पाहायला मिळेल.






असा आहे पाहुण्यांसाठी उभारलेला तंबू


या व्हिडिओमध्ये सायना सगळे तंबू पहिल्यांदा दाखवते. त्यानंतर ती या तंबूची सफर देखील घडवते.  आत एक ड्रॉईंग रूम, एक बेड रूम आणि एक छोटी खोली बांधली आहे. सोफा, बेड, टीव्ही, ड्रेसिंग टेबल, सिटींग,  एसी अशा अनेक सुविधा या तंबूत आहे.  हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की तंबूच्या आतील व्यवस्था पंचतारांकित हॉटेलसारखीच आहे.


राधिका आणि अनंत यांच्या प्री वेडिंगचे कार्यक्रम हे 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान जामगरमध्ये पार पडणार आहेत. यासाठी बॉलीवूडकरांनी हजेरी लावली आहे. 


ही बातमी वाचा : 


अजय देवगण मुलगी निसा आणि अमन सोबत अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगसाठी जामनगरमध्ये दाखल!