Oscars 2022 :  काल (29 मार्च) ऑस्कर पुरस्कार 2022  (Oscars Awards 2022) सोहळा पार पडला. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथला (Will Smith) ऑस्कर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याला 'किंग रिचर्ड' (King Richards) या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टर हा पुरस्कार प्रदान आला आहे. काल पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यामध्ये एक घटना घडली. विल स्मिथनं  ख्रिस रॉक (Chris Rock) च्या कानशिलात लगावली. या घटनेबद्दल अमूल कंपनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. 

Continues below advertisement

अमूलची खास पोस्ट 

विल स्मिथची पत्नी जॅडा स्मिथ हिच्याबाबत ख्रिस रॉकनं वक्तव्य केलं. त्यानंतर स्टेजवर जाऊन रॉकनं  ख्रिसच्या कानशिलात लगावली. अमूलनं शेअर केलेल्या ट्वीटमध्ये  व्यंगचित्र दिसत आहे. ही पोस्ट शेअर करून अमूलनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'स्नॅक डोण्ट स्मॅक'. 'ख्रिस रॉक बाय स्लॅप' असंही या पोस्टमध्ये लिहिलेलं दिसत आहे.

Continues below advertisement

अमूलच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. वेगवेगळ्या चित्रपटांबद्दलच्या तसेच घटनांबद्दलच्या खास पोस्ट अमूल कंपनी त्यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर करतात. 

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha