Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरच्या (Amruta Khanvilkar) 'चंद्रमुखी' (Chandramukhi) या सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. लहान मुलींपासून ते अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील या गाण्यावर डान्स करत आहेत. आता कोल्हापुरातील (Kolhapur) एका जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थीनी या गाण्यावर थिरकली आहे. अमृताने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनुस्कुरा या भागात राहणारी हर्षदा कांबळे सध्या चर्चेत आहे. हर्षदा कोल्हापुरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहे. हर्षदाला नृत्याची आवड असल्याने तिने 'चंद्रा' या गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ शाळेतील शिक्षकांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि अल्पावधीतच व्हायरल झाला. 


चिमुकल्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकर फिदा (Amruta Khanvilkar Shared Video)


चिमुकल्या हर्षदा कांबळेच्या अदाकारीवर अमृता खानविलकरदेखील फिदा झाली आहे. अमृताने हर्षदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने 'चिमुकली चंद्रा', असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओवर खूप सुंदर बाळा, लय भारी, अप्रतिम नृत्य, ग्रामीण भागातील कलाविष्काराचा एक उत्तम नमुना, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 



चिमुकली चंद्रा असलेल्या हर्षदा कांबळेबद्दल जाणून घ्या... (Who is Harshada Kamble)


जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारी हर्षदा कांबळे ही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडील्या अनुस्कुरा या दुर्गम भागात राहणारी विद्यार्थीनी आहे. दररोज तीन-चार किलोमीटर पायपीट करुन जिल्हा परिषद शाळेत ती शिक्षण घेते. हर्षदाला नृत्याची खूप आवड असून अभ्यासातदेखील ती खूप हुशार आहे. वक्तृत्व कलेमध्येदेखील ती आघाडीवर आहे. 


अमृता खानविलकरचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' (Chandramukhi) या कादंबरीवर आधारित आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी या सिनेमात दाखवण्यात आली होती. 


अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडलं लावलं आहे. चाहत्यांचे या लावणीवरील नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा सोशल मीडियाला रामराम; चाहत्यांकडून चिंता व्यक्त