Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर शहरातील खानगल्लीत सुरू असलेल्या एका कुंटणखान्यावर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह अन्य तिघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह मोबाईल असा एकूण 1 लाख 19  हजार 763 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी (20 मार्च) रोजी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कुंटणखाना चालविणाऱ्या दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून वैजापूर शहरातील खानगल्लीत एका इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने एका बनावट ग्राहकाला पाठवून सापळा रचला. ग्राहकाने येथे व्यवसाय सुरू असल्याची खात्री केल्यानंतर पोलिसांच्या पथकास इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला असता वेश्या व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांसह तिघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 36,000 रुपये किमतीचे 10 मोबाईल मोबाईल संच, 81 हजार 763  रुपये रोख, दोन हजार रुपये किमतीचे अन्य साहित्य असा एकूण 1 लाख 19  हजार 763 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 


मिळालेल्या पैशांपैकी अर्धे पैसे आरोपींना...


पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच महिला वेश्याव्यवसाय करतांना मिळून आल्या. तर वेश्यगमण करण्याकरिता आलेले तीन ग्राहक (पुरुष) यांना छापा कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान कारवाईच्या वेळी मिळून आलेल्या महिलांकडे विचारपूस केली असता, त्या मध्यस्थी तीन महिला यांच्या सांगण्यावरुन खान गल्ली येथे असलेल्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगीतले. त्या बदल्यात सदर महिला या वेश्यगमणातून मिळालेल्या पैशांपैकी अर्धे पैसे आरोपींना देत होत्या. या प्रकरणी पोलीस स्टेशन वैजापुर येथे स्त्री आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम ( पिटा ॲक्ट ) 1956 या कायद्याच्या विविध कलमांतर्गत मध्यस्थी तीन महिला यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर पुढील तपास वैजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे हे करत आहेत.


यांनी केली कारवाई...


ही कारवाई, सहायक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, पोउपनि श्रीराम काळे, पोलीस अंमलदार मोईस बेग, ज्ञानेश्वर शिंदे, अजय गोलवाल, योगेश कदम, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, प्रशांत गिते, विजय भोटकर, पंकज गाभूड, गणेश पैठणकर, नवनाथ निकम महिला पोलीस अंमलदार वर्षा गादेकर आदी यांच्या पथकाने केली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :


काय सांगता! दुचाकीला लॉक असल्याने चक्क टायर चोरून नेले, छत्रपती संभाजीनगरमधील घटना