Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा महाराष्ट्रात गाजला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण राज्यात पसरलं. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उभारलेल्या लढ्याला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. आता हाच लढा मोठ्या पडद्यावरही साकारला जाणार आहे. आम्ही जरांगे या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतली मातब्बर मंडळी दिसणार आहे. प्रसाद ओक (Prasad Oak), अजय पुरकर (Ajay Purkar), सुबोध भावे (Subodh Bhave) ही स्टारकास्ट या सिनेमा दिसणार आहे.


दरम्यान या सिनेमात अभिनेते मकरंद देशपांडे हे मनोज जरांगे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात प्रसाद ओक हा अण्णासाहेब जावळे, अजय पूरकर हे माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका साकारणार आहेत. त्याचप्रमाणे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, चिन्मय संत,अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही मंडळी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 


'या' दिवशी येणार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला


आम्ही जरांगे हा सिनेमा येत्या 14 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या सिनेमात उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले हे सहनिर्माते आहेत.            






एकाच दिवशी रिलीज होणार सिनेमे


मनोज जरांगे यांच्यावरील चित्रपट आधी बॅक टू बॅक आठवड्यात रिलीज होणार होते. आता मात्र, दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. 'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचा टीझर गुरुवारी (30 मे रोजी) लाँच करण्यात आला. या टीझरनुसार हा चित्रपट 14 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. 'संघर्षयोद्धा...मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट आधीच रिलीज होणार होता. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, 'आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाच्या टीझर लाँच नंतर आता या संघर्षयोद्धा चित्रपटाने आपली रिलीज डेट आता एक आठवडा आधीच जाहीर केली आहे. 


ही बातमी वाचा : 


Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका