Kacha Baadam Song Dance : सोशल मीडियावर कच्चा बदाम गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्यावरील डान्सचे व्हिडीओ अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच अल्लू अर्जुननं (Allu Arjun)देखील या गाण्यावरील व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुनची मुलगी अरहा (Arha) ही कच्चा बदाम या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. 


अल्लू अर्जुननं अरहाच्या हा व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'माय लिटील बदाम'. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाइक केले असून काहींनी कमेंट्स देखील केल्या आहेत. 'मुलगी तिच्या वडिलांसारखी टॅलेंटेड आहे', अशा कमेंट्स अनेकांनी  केल्या आहेत. अल्लू अर्जुन कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्यानं अरहाचा एक खास फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये आरहा अल्लू अर्जुनचं स्वागत करताना दिसत आहे. 






अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्न समारंभ त्यावेळी चर्चेत होता. जवळपास 100 कोटी रूपये या समारंभासाठी खर्च करण्यात आले होते.  


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha