Priyanka Gandhi : काँग्रेसला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची जबाबदारी सध्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या खांद्यावर आहे. प्रियंका गांधी यांच्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींची छवी दिसते.  याच प्रियंका गांधी आता निवणडुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. स्वतः प्रियंका गांधींनी हे जाहीर केलं आहे. एबीपीच्या घोषणापत्र या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सध्यातरी निवडणूक लढवण्याची वेळ आलेली नाही. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा नक्की निवडणूक लढेन असं प्रियंका गांधींनी जाहीर केलंय.
   
उत्तर प्रदेशची निवडणूक प्रियंका गांधींनी का लढवली नाही


सध्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेसाठी निवडणूक सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. एकूण सात टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांचा जोरदर प्रचार सुरू आहे. दरम्यान, यूपीच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात योगी आदित्यनाथ ते अखिलेश यादव  उतरले आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी या मात्र निवडणूक लढवत नाहीत.  जेव्हा प्रियंका गांधी यांन विचारण्यात आले की त्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या नाहीत? यावेळी त्यांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. माझा राजकीय अनुभव पाहता मला वाटते की, आता निवडणूक लढवण्याची योग्य वेळ नाही असे त्या म्हणाल्या.


निवडणुकीच्या वेळी फक्त विकास आणि सध्याच्या मुद्यांवरच बोलले पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. ज्यामध्ये तरुणांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. तसेच महिलांसाठीही भरपूर घोषणा केल्या आहेत. आमच्या जाहीरनाम्यात कोणताही पोकळ आश्वासने नाहीत. आम्ही 20 लाख नोकऱ्या देऊ असे म्हणत आहोत, इतर पक्षही तेच  म्हणत आहेत. पण आम्ही तुम्हाला दाखवू की, 20 लाख नोकऱ्या कोठे आहेत. रिंक्त रिक्त पदे कोठे आहेत हे दाखवू असे प्रियंका गांधी म्हणाल्या.


महत्त्वाच्या बातम्या: