Pushpa 2 Stampede Hyderabad : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जूनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2 मुळे अल्लू अर्जूनच्या अडचणीत वाढ झाली आहे. हैदराबाद येथील चित्रपटगृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जूनने हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अल्लूला पाहण्याच्या प्रयत्नात चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि धक्काबुक्की झाली. याचं रुपांतर नंतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जूनला अटक करत कारवाई केली आहे. पोलिस कारवाई करण्यासाठी अल्लूच्या घरी पोहोचले तेव्हा तो हाफ पँटवर होता आणि त्याच्या पायात चप्पलही नव्हती. अशाच अवस्थेत पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली याचा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


घरात जाऊन पोलिसांनी अल्लू अर्जुनला ताब्यात घेतलं


हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 च्या प्रीमियरला हजेरी लावत अल्लू अर्जूनने चाहत्यांना मोठा धक्का दिला. पुष्पा चित्रपटामुळे अल्लू अर्जूनच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अल्लू अर्जून पुष्पा 2 च्या प्रीमियरला पोहोचताच त्याचा पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. 'पुष्पा'ची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले होते. यावेळी  अल्लूला पाहण्यासाठी जमावामध्ये धक्काबुक्की केली. यावेळी मोठा गोंधळ उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिची दोन मुलं जखमी झाली.


अल्लू अर्जूनला पोलिसांकडून अटक


अभिनेता अल्लू अर्जून याने पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अचानक थिएटरमध्ये हजेरी लावली. यावेळी उसळलेल्या मोठ्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. अल्लू अर्जून प्रीमियरसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता पोहोचल्याची माहिती आहे. अल्लू अर्जून येण्याची पूर्वसूचना नसल्यामुळे तिथे गर्दीचं व्यवस्थापन आणि पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता. याप्रकरणी मयत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन अल्लू अर्जून आणि थिएटर व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणी पोलिसांनी आता कारवाई केली आहे.


अल्लू अर्जूनवर आरोप काय?


पुष्पा 2 च्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जुनने उपस्थितीबद्दल आगाऊ माहिती न दिल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर संध्या थिएटरवर सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर अल्लू अर्जूनने मृत महिला आणि तिच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत 25 लाख रुपयांची मदत केली. तसेच शोक व्यक्त करणारा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला होता.


चेंगराचेंगरीत एका महिलेचा बळी


'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला संध्या सिनेमागृहात विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. लोक ॲडवान्स बुकींग करुन चित्रपट पाहायला आले होते आणि अल्लू अर्जुनही तिथे येणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हते. पण अल्लू अर्जुनच्या टीमने अचानक शोच्या प्रीमियरला भेट देण्याचं ठरवलं. यानंतर अल्लू अर्जून संध्या थिएटरमध्ये पोहोचताच त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे अल्लू अर्जुन आणि इतरांवर निष्काळजीपणाचा आरोप झाले.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : अल्लू अर्जुनला अटक, हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई