Alia-Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची (Alia Bhatt) पाठवणी करताना आई सोनी राझदान (Soni Razdan), वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) आनंदी आणि भावूकही झाले होते. पण, त्यांच्यासोबतच आलियाची वर्षानुवर्षे सावलीसारखी काळजी घेणारा तिचा मराठमोळा बॉडीगार्ड सुनील तळेकर (Sunil Talekar) देखील खूप भावूक झाला होता. आलियाच्या लग्नानंतर तिच्या बॉडीगार्डने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून, ज्या प्रकारे ह्रदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे, त्यावरून सगळेच आलियावर किती प्रेम करतात हे स्पष्ट होते. आलिया तिचे कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त तिच्या आजूबाजूच्या लोकांची देखील खूप काळजी घेते.
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (ranbir Kapoor) यांच्या लग्नानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण, ज्यांनी आलियाला लहानपणापासून पाहिलं आहे आणि तिची काळजी घेतली आहे, असे सगळेच तिला नववधूच्या रूपात पाहून भावूक होत आहेत. आलियाला आपली मुलगी मानणारा चित्रपट निर्माता करण जोहर देखील आलियाला वधूच्या पोशाखात पाहून रडला होता.
'तुझे चिमुकले हात धरण्यापासून…’
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर करून आलियाचा बॉडीगार्ड सुनील याने पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट वाचून तुम्हीही भावूक व्हाल. सुनीलने लिहिले, 'तुझे चिमुकले हात धरण्यापासून ते तुला वधूच्या रूपात पाहण्यापर्यंत, मी म्हणू शकतो की, आज माझे हृदय आनंदाने भरले आहे'. सुनीलचे हे कॅप्शन वाचणाऱ्या सर्वांचे मन भरून आले.
पाहा पोस्ट :
बऱ्याच काळापासून आलिया भट्टच्या कुटुंबासोबत असणाऱ्या सुनीलने अलीकडेच सोनी राजदानसोबत आलियाचा बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सुनील आलियाशी इतका जोडला गेला आहे की, तो अभिनेत्रीच्या प्रत्येक चित्रपटाचे सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन करत असतो. आलिया कुठेही जावो, तो नेहमी तिच्यासोबत सावलीसारखा असतो. लहानपणापासून आलियाची काळजी घेणाऱ्या सुनीलला आलियाला वधूवेशात पाहून आपल्या भावना रोखता आल्या नाहीत.
हेही वाचा :
- Alia Ranbir Wedding : आलियाच्या मंगळसूत्राची डिझाइन आहे खास; जाणून घ्या आठ नंबर सोबतच कनेक्शन
- Alia Ranbir Wedding : अरेच्चा! आलियानं लग्नासाठी कॉपी केला कंगनाचा दोन वर्षापूर्वीचा लूक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
- Alia Ranbir Wedding : 'छैय्या छैय्या'वर डान्स; तर वर-माले वेळी असं काही घडलं... रणबीर अन् आलियाच्या लग्नातील 'हे' व्हिडीओ व्हायरल