Alia Bhatt : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. आलिया आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी काही दिवसांपूर्वी चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती. आलिया आणि रणबीर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. आलियानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी भन्नाट रिअॅक्शन्स दिल्या. काहींनी आलिया आणि रणबीरला ट्रोल देखील केलं. एका मुलाखतीमध्ये आलियानं या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. करिअरच्या महत्वाच्या टप्प्यावर असताना आई होण्याच्या निर्णयाबाबत आलियानं मुलाखतीमध्ये सांगितलं.
ट्रोलर्सला आलियाचं सडेतोड उत्तर
आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आलियानं एका मुलाखतीमध्ये तिला ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'एखाद्या महिलेनं काही जरी केलं तरी ती हेडलाईन होते. आई होण्याचा निर्णय, डेटिंग आणि ट्रिप अशा काही कारणांमुळे महिला या स्पॉटलाइटमध्ये राहतात. '
लहान वयात आई होण्याच्या निर्णयाबाबत आलिया काय म्हणाली?
'मला पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये बॅलेन्स करायला येतं. अनेक वेळा तुम्ही काही गोष्टी प्लॅन करत नाहीत तरी देखील त्या होतात. सगळं काही आपोआप होतं. ' असं आलियानं मुलाखतीमध्ये सांगितलं. पुढे आलिया म्हणाली, 'मला या गोष्टीचा आनंद वाटतो की लोकांचा दृष्टीकोण बदलत आहे. मी असे अनेक आर्टिकल वाचले जे मला सपोर्ट करतात.'
आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट 5 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. डार्लिंग्स या चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत के रीन यांनी केलं आहे. चित्रपटात आलियासोबतच शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. यानंतर तिचा‘ब्रह्मास्त्र’हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा: