wheat prices : सध्या देशात गव्हाच्या किंमतीत (wheat prices ) मोठी वाढ झाली आहे. उष्णेतेच्या लाटेचा गहू पिकाला बसलेला फटका आणि  सध्या गव्हाला होत असलेली मागणी यामुळं किंमती वाढत आहे. गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पुरवठा कमी होत असल्यानं गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी (Traders) दिली आहे. दरम्यान, बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या गव्हाची विक्री केली आहे. मात्र, मोठ्या व्यापाऱ्यांकडे सध्या गव्हाचा साठा शिल्लक आहे.


गव्हाला मिळतोय विक्रमी दर


सध्या बाजारपेठेत गव्हाची मागणी वाढली आहे. मागणी वाढली तरी पुरवठा मात्र, कमीच आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती इंदूरमधील व्यापारी गोपालदास अग्रवाल यांनी दिली आहे. स्थानिक बाजारात गव्हाच्या किंमती या 23 हजार 547 रुपये प्रति टनावर पोहोचल्या आहेत. गव्हाला मिळणारा हा दर विक्रमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, 14 मे रोजी सरकारनं निर्यातीवर अचानक बंदी घातली होती. त्यानंतर गव्हाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे.


यावर्षी धान्य बाजारातील पुरवठा सामान्यपेक्षा खूपच कमी होता. 2022 चे उत्पादन सरकारच्या अंदाजापेक्षा काही प्रमाणात घसरल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. सरकारचा 106.41 दशलक्ष टनांचा अंदाज वास्तविकतेच्या जवळपास नाही. पुरवठा सुमारे 95 दशलक्ष टन उत्पादन सुचवत आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. 2020-21 मध्ये देशातील गव्हाचे उत्पादन हे 109.59 दशलक्ष टन होते. त्यामानानं 2021-22 मध्ये गव्हाचे उत्पादन हे 106.41 दशलक्ष टन इतके आहे. 2016-17 पासून गेल्या पाच वर्षात गाठलेल्या 103.89 दशलक्ष टन सरासरी वार्षिक गव्हाच्या उत्पादनापेक्षा जास्त आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे यावर्षी उत्पादन कमी होईल असा अंदाज सरकारने व्यक्त केला होता. सरकारी गहू खरेदीमध्येही कमी पुरवठा दिसून येत आहे.  दरम्यान, मार्च 2023 मध्ये नवीन हंगामाचा पुरवठा उपलब्ध होईपर्यंत बाजारात हस्तक्षेप करण्यासाठी सरकारकडे थोडासा साठा असेल, असे एका जागतिक व्यापार फर्मच्या डिलरने सांगितले.


महत्त्वाच्या बातम्या: