Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे. 


काय म्हणाली आलिया? 
आरजे सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीमध्ये आलियाला रणबीरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी आलिया म्हणाली, 'रणबीरने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतलीये. पण तो मस्करी करत होता. स्पष्टपणे आपल्याकडे माहितीचा अभाव असल्यानं या चर्चा होत आहेत. सर्वांनी माझ्यासाठी आणि रणबीरसाठी प्रार्थना करावी.'


फिल्म कंपेनियनला दिलेल्या मुलाखतीत रणबीरला दोन खऱ्या गोष्टी आणि एक खोटी बोलायला सांगितली होती. तो म्हणाला, "मला जुळी मुले आहेत, मी एका मोठ्या पौराणिक चित्रपटाचा भाग बनणार आहे, मी कामातून बराच ब्रेक घेत आहे." त्यानंतर रणबीरनं हे स्पष्ट देखील केलं होतं की, तो मस्करी करत आहे. पण त्यानंतर काहींनी रणबीर आणि आलियाला जुळी मुलं होणार आहेत, अशी अफवा पसरवण्यास सुरु केली. 


आलियाचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. 


हेही वाचा: