Alia Ranbir Wedding : अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांच्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर हे 17 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाबाबत आलिया आणि रणबीरनं अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता लग्नाच्या चर्चेवर आलियानं पहिली रिअॅक्शन दिली आहे. 
 
प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया म्हणजेच बी. यूनिकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं कबीर सिंह या चित्रपटातील एक सिन रिक्रिएट केला आहे. या व्हिडीओला बी. यूनिकनं कॅप्शन दिलं, 'Me on 17th April' आणि ब्रोकन हार्ट इमोजी देखील बी. यूनिकनं शेअर केलं आहे. या व्हिडीओवर आलिया भटनं रिअॅक्शन दिली आहे. तिनं 'डेड' अशी कमेंट या व्हिडीओला केली आहे. त्यामुळे आता आलियानं लग्नाच्या चर्चेवर पुर्णविराम लावला आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.  






 नीतू कापूर यांदी दिली होती प्रतिक्रिया 
नीतू सिंह यांना एका मुलाखतीमध्ये 'रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारिख काय आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'देवालाच माहिती', असं उत्तर दिलं. तर नीतू सिंह यांनी पुढे सांगितलं, 'मला सेलिब्रेट करायचं आहे, लोकांना देखील याबाबत सांगायचंय पण आजच्या पिढीतील मुलं थोडा वेगळा विचार करतात. मला त्यांच्या लग्नाबाबत काहीही माहित नाही. कारण ते दोघे त्यांच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवतात. ते कधी लग्न करतील ते माहित नाही पण माझी इच्छा आहे की त्यांनी लवकरच लग्नगाठ बांधावी. आलिया खूप चांगली मुलगी आहे. त्या दोघांची छान जोडी होऊ शकते.'  


हेही वाचा :