Alia Bhatt Ranbir Kapoor Fans : बॉलिवूडमधील क्यूट कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी नुकत्याच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे कपूर आणि भट्ट घराण्यात आनंदाचं वातावरण आहे. या कपलला बॉलिवूडमधील सेलिब्रिटींकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र, रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांकडूनही सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. चाहत्यांनी वेगवेगळ्या व्हिडीओ आणि ट्विटच्या माध्यमातून या कपलना शुभेच्छा दिल्या आहेत. 


आलिया भट्टची एचएन रिलायन्स रुग्णालयात प्रसूती झाली आहे. आलिया आणि रणबीरच्या बाळाच्या जन्मानंतर कपूर कुटुंब आणि भट्ट कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. दोन्ही कुटुंब अगदी आतुरतेने छोट्या पाहुण्याची वाट पाहत होते आणि आज अखेर तो क्षण आला. त्यामुळे प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हसू आहे. मात्र, यामध्ये आलिया आणि रणबीरचे चाहतेही कुठे मागे नाहीत. त्यांनीदेखील हा आनंद सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.  


सोशल मीडियावर प्रत्येकजण रणबीर आलियाच्या लग्नाचे फोटो शेअर करताना दिसतोय. तर, आगामी आयुष्यासाठी काही शुभेच्छा देत आहेत.  


चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव 






दरम्यान, रणबीरचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका शोमध्ये गेस्ट म्हणून आलेला रणबीर आपल्या हातात लहान बाळ घेऊन प्रॅक्टीस करताना दिसत आहे. यावेळी रणबीरने आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. अखेर रणबीरची ही इच्छा पूर्ण झाल्यामुळे चाहतेदेखील फार खुश आहेत. तसेच, रणबीर सर्वात चांगला बाप होईल असेदेखील काही चाहत्यांनी म्हटलं आहे.    






आलियाचा बालपणीचा फोटो शेअर करत एका चाहत्याने लिहिले आहे, 'छोटी आलिया आली आहे'.






सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून प्रत्येकजण किती आनंदी आहे याचा अंदाज लावता येतोय. एका चाहत्याने तर मागील बाजूने रणबीर आलियाचे स्केच शेअर केले आहे. त्याचवेळी रणबीरच्या मांडीवर एका छोट्या राजकुमारीचे स्केच दिसत आहे.






महत्वाच्या बातम्या : 


Alia-Ranbir Welcome Baby Girl: आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव