Alia Ranbir Wedding : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा लग्न सोहळा आज पार पडला. काल (13 एप्रिल) हळद आणि मेहंदी सोहळा पार पडला. अनेक सेलिब्रिटींनी आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. अमूल (Amul) ही कंपनी देशात तसेच जगभरात घडलेल्या घटनांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतात. नुकतीच आलिया आणि रणबीरसाठी अमूल कंपनीनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोनं आणि त्याला दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधलं. नेटकऱ्यांनी देखील या पोस्टला खास कमेंट्स केल्या आहेत. 


अमूलनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये नववधू आणि वर दिसत आहेत. तसेच एक मुलगी हातात बटर लावलेल्या ब्रेडची प्लेट घेऊन उभी असलेली दिसत आहे. या फोटोवर 'पट मंगनी, भट शादी' असं लिहिलेलं दिसत आहे. तर स्टार बटर असंही या फोटोवर लिहिलं दिसत आहे. कॅप्शनमध्ये 'द आलिया आणि रणबीर की शादी', असं लिहिलेलं आहे. एका नेटकऱ्यानं या पोस्टला कमेंट केली, 'lovely' तर दुसऱ्यानं लिहिले, 'ये आच्छा था' अनेकांनी या पोस्टला हार्ट इमोजी शेअर करून कमेंट  केली आहे. 






आलिया-रणबीर बैसाखीच्या मुहूर्तावर पती-पत्नी झाले आहेत. पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघेही लग्नबंधनात अडकले. सध्या आलिया आणि रणबीरला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छा देत आहेत. लग्नसोहळ्यात आलियानं तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान केला होता. 


हेही वाचा :