Ranbir Kapoor, Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. रिपोर्टनुसार, रणबीर अनेक लोकांबद्दल गॉसिपींग करत असतो. त्याला गॉसिप करायला आवडते. आलियानं रणबीरच्या या गोष्टीबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
आलियनं म्हणाली, 'रणबीर लोकांबद्दल नेहमी चांगलचं बोलतो. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी रणबीरचा आदर करते. सगळे लोक गॉसिप करतात. रणबीर गॉसिप करतो अशी चर्चा असल्यामुळे त्याची इमेज थोडी खराब झाली आहे. पण खऱी गोष्ट ही आहे की, त्याला गॉसिप करायला आवडत नाही. त्यामुळे आता मी देखील गॉसिप करत नाही. '
आलिया आणि रणबीरची ओळख ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटा दरम्यान झाली. त्यानंतर ते दोघेही अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला उपस्थित होते. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत., असही म्हटलं जात आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
संबंधित इतर बातम्या
Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha