Aishwaryaa Rajnikanth Dhanush Divorce : सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची लेक ऐश्वर्या रजनीकांतला (Aishwaryaa Rajnikanth) कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाद्वारे तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. 


ऐश्वर्याने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की,"सर्व आवश्यक खबरदारी घेतल्यानंतरही मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या रुग्णालयात दाखल आहे. कृपया सर्वांनी मास्क घाला, लस अवश्य घ्या". तिच्या या पोस्टवर तिचे चाहतेदेखील कमेंट करत आहेत. तिच्या या पोस्टला 68 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर  1100 हून अधिक कमेंट्सही आल्या आहेत.



अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या  रजनीकांत यांनी नुकताच घटस्फोट झाला आहे. 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले. धनुष आणि ऐश्वर्या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची घोषणा केली होती.  ऐश्वर्या आणि धनुष 2004 साली लग्नबंधनात अडकले होते. तसेच त्यांना दोन मुले आहेत.


धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर मीडियावर विभक्त झाल्याची माहिती देत लिहिले होते,"मित्र, जोडपे, आई-वडील आणि एकमेकांचे हितचिंतक म्हणून 18 वर्षे एकत्र राहण्याचा हा प्रवास समजूतदारपणाचा, जुळवून घेण्याचा होता. पण आज आम्ही दोघांनी  विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा".  


संबंधित बातम्या


'83'च्या यशानंतर आदिनाथ कोठारेची पुन्हा बॉलिवूड झेप, रोहन सिप्पीच्या आगामी चित्रपटात झळकणार!


Bhool Bhulaiyaa 2: ‘RRR’शी टक्कर टळली, कार्तिक-कियाराचा ‘भूल भुलैया 2’ आता ‘या’ दिवशी होणार रिलीज!


Radhe Shyam Release Date : ठरलं! ‘डार्लिंग’ प्रभासचा 'राधे श्याम' या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha