Ali Fazal , Richa Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha)आणि अली फजल (Ali Fazal) यांच्या जोडीची चर्चा सोशल मीडियावर होत असते. रिचा आणि अली हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. पण त्यांच्या लग्नाबाबत त्यांनी अजून कोणताही खुलासा केला नाही. त्यांचा विवाह सोहळा मार्च 2022 मध्ये होणार असल्याची चर्चा सुरू होती. आता अलीनं एका मुलाखतीमध्ये लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
तु लग्न कधी करणार? असा प्रश्न जेव्हा अली फजलला विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिले, 'मी अजून या गोष्टीवर कोणतीही कमेंट करू इच्छित नाही. जेव्हा आम्ही लग्न करणार आहोत तेव्हा आम्ही त्याबद्दल सर्वांना सांगणार आहोत. सध्या आम्ही आमच्या प्रोडक्शन हाऊसकडे लक्ष देत आहोत. या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट या वर्षी देखील रिलीज होऊ शकतो. त्यामुळे आम्ही व्यस्त आहोत.' रिचा आणि अलीचे चाहते त्यांचे सोशल मीडियावरील पोस्टला नेहमी पसंती देत असतात. 'ते दोघे लग्न कधी करणार आहेत?' असा प्रश्न त्याचे चाहते त्याच्या पोस्टला कमेंट करून विचारतात.
अली सध्या हॉलिवूडमधील एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिजी आहे. या चित्रपाटचे शूटिंग झाल्यानंतर रिचा आणि अली लग्नाची तयारी सुरू करतील. रिचा आणि अलीने 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न्स' या चित्रपटामध्ये एकत्र काम केले. फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची ओळख झाली.
संबंधित इतर बातम्या
Amitabh Bachchan : बिग बी आहेत 'या' अभिनेत्रीचे फॅन; म्हणाले, 'त्या खूप सुंदर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha