Akshaye Khanna First Look In Chhaava Movie : नव्या वर्षात रिलीज होणाऱ्या अनेक मोस्ट अवेटेड चित्रपट आणि वेब सीरिजची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. त्यापैकी एक म्हणजे, 'छावा' (Chhaava Movie). विकी कौशलचा (Vicky Kaushal) आगामी 'छावा' (Upcoming Chhaava Movie) चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. येत्या 14 फेब्रुवारीला हा चित्रपट थिएटर्समध्ये रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. अशातच आता निर्मात्यांनी चित्रपटातील इतर स्टार्सचे लूक जारी करण्यात सुरुवात केली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच आता निर्मात्यांनी चित्रपटातील औरंगजेबाचा लूक जारी केला आहे. लांब दाढी, पांढरे केस आणि चेहऱ्यावर सुरकुत्या असा धडकी भरवणारा चित्रपटातील औरंगजेबाचा लूक निर्मात्यांनी जारी केला आहे. पण, हा अभिनेता कोण आहे? हे ओळखणंही कठीण झालं आहे. तुम्ही तरी ओळखलं का 'छावा'मध्ये दिसणारा हा औरंगजेब कोण आहे ते? औरंगजेबाचा लूक पाहून सर्वांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
विकी कौशलचा आगामी चित्रपट 'छावा' सध्या खूप चर्चेत आहे. निर्मात्यांनी काही काळापूर्वी चित्रपटातील विकी कौशलचा पहिला लूक रिलीज केला होता. यानंतर, चित्रपटात महाराणी येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या रश्मिका मंदानाचा लूक समोर आला. आता चित्रपटातील औरंगजेबाचा पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे, जो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 'छावा' मध्ये औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहे आणि त्याचा लूक इतका भारी आहे की, त्याला ओळखणंही कठीण होऊन बसलं आहे.
पांढरे केस, डोळ्यांत काजळ, पांढरी लांबलचक दाढी आणि चेहऱ्यावर सुरकुत्या... मोघलांच्या इतिहासातील सर्वात क्रूर शासक अशी ओळख असणाऱ्या औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्नाला ओळखणंही कठीण होऊन बसलं आहे. अक्षयचे डोळे चक्क सूडाची आग ओकत असल्याचं दिसत आहे. या गेटअपमध्ये अक्षय खन्ना खूपच भारी दिसतोय. लूक पाहून कुणीच अक्षय खन्नाला ओळखू शकत नाही.
डोळ्यात अंगार, पांढरे केस अन् चेहऱ्यावरच्या सुरकुत्या; धडकी भरवणारा अक्षय खन्नाचा लूक
मॅडॉक फिल्म्सनं मंगळवारी अक्षय खन्नाचा हा लूक शेअर केला. पोस्टरमध्ये, औरंगजेबची भूमिका करणारा अक्षय डोळ्यातून आगीच्या ठिणग्या बाहेर काढत दिसत आहे आणि तो रागानं त्याच्या शत्रूंकडे पाहत आहे. त्याचे लांबलचक पांढऱ्या केसांनी त्याचा चेहरा झाकला आहे, तरी त्यातून त्याची तीक्ष्ण नजर दिसतेय, जी शत्रूंना यमसदनी धाडण्यासाठी आतूर झाली आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलं आहे की, 'भीती आणि दहशतीचा नवा चेहरा. मुघल सम्राट औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना.'
अक्षय खन्नाचा लूक पाहून चाहते हैराण
अक्षय खन्नाच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही चाहते म्हणतात की, या लूकमध्ये अक्षय खन्ना अमिताभ बच्चनसारखा दिसतो. तर, दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलंय की, "ओजी परत आला आहे", एका युजरनं म्हटलंय की, "अक्षयकडे पाहून तो अमिताभ बच्चन असल्यासारखं का वाटतं?" आणखी एकानं लिहिलंय की, "मी अक्षय खन्नाचा खूप मोठा चाहता आहे. मी पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाची वाट पाहत आहे."
14 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार 'छावा'
'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे आणि निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीवर आधारित आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :