Saif Ali Khan Jabalpur Property: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) चोरट्यानं घरात घुसून चाकूनं हल्ला केला होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल करण्यात आलं. काल (21 जानेवारी), 5 दिवसांनंतर, अभिनेत्याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. चोरटा लपूनछपून थेट सैफ आणि करिनाचा (Kareena Kapoor Khan) लहान मुलगा जेहच्या खोलीत जाऊन पोहोचला होता. या हल्ल्यानंतर खान कुटुंब पूर्णपणे हादरलं होतं. अशातच आता या धक्क्यातून सावरत नाहीतर सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबावर आणखी एक संकट येणार आहे. सैफ अली खानच्या  (पतौडी) कुटुंबाची भोपाळमध्ये 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता आहे, जी सरकार ताब्यात घेऊ शकतं.


शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत ही मालमत्ता सरकारची असू शकते. 2015 पासून भोपाळमधील ऐतिहासिक संस्थानांच्या मालमत्तेवर बंदी होती. उच्च न्यायालयानं पतौडी कुटुंबाला अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ दिला होता. पण, पतौडी कुटुंबानं दिलेल्या वेळेत त्यांची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे आता सरकार कारवाई करू शकतं. पण असं असलं तरीसुद्धा अजूनही पतौडी कुटुंबाकडे एक पर्याय खुला आहे. आता पतौडी कुटुंबाकडे डिव्हिजन बेंचमध्ये आदेशाला आव्हान देण्याचा पर्याय आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


भोपाळ राज्यातील ऐतिहासिक मालमत्तांवरील 2015 पासून असलेली स्थगिती आता उठवण्यात आली आहे. शत्रू मालमत्तेच्या प्रकरणात, मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं (जबलपूर) अभिनेता सैफ अली खान, आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि सबा अली खान आणि सैफची काकू सबिहा सुलतान यांना या प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. पण, पतौडी कुटुंबानं निर्धारित वेळेत आपली बाजू मांडलेली नाही. ही मुदत आता संपली आहे आणि मुदत संपूनही कुटुंबाकडून अजून कोणताही दावा करण्यात आलेला नाही. 


सैफची मालमत्ता सरकारच्या नियंत्रणात का येऊ शकते?


1968 मध्ये शत्रू मालमत्ता कायदा लागू करण्यात आला. याअंतर्गत, फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या लोकांच्या भारतात सोडलेल्या मालमत्तेवर केंद्र सरकारचा अधिकार आहे. स्थगिती उठवल्यानंतर, सरकार आता शत्रू मालमत्ता कायदा आणि 2015 च्या आदेशानुसार, नवाबाची मालमत्ता आपल्या ताब्यात घेऊ शकतं. 2015 मध्ये, केंद्र सरकारनं म्हटलं होतं की, नवाब हमीदुल्ला खान यांच्या मालमत्तेची कायदेशीर वारस त्यांची मोठी मुलगी आबिदा होती, जी पाकिस्तानात स्थलांतरित झाली होती. म्हणून ही मालमत्ता शत्रू मालमत्ता कायद्यांतर्गत येते.


साजिदा सुलतान म्हणजे, सैफ अली खानची आजी 


नवाबाची दुसरी मुलगी साजिदा सुलतान यांचे वंशज (सैफ अली खान आणि शर्मिला टागोर) या मालमत्तेवर आपला दावा सांगत आहेत. साजिदा सुलतान ही नवाब पतौडी यांची आई आणि सैफ अली खान यांची आजी होती. ती आयुष्यभर भारतात राहिली. त्याची बहीण राबिया सुलतान होती, जी भारतातच राहत होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


"मणक्याला झालेली दुखापत एवढ्या लवकर बरी झाली?"; हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताच सैफचा फिट लूक पाहून चाहते हैराण