Nagarjuna, Naga Chaitanya : नागा चैतन्य  (Naga Chaitanya) आणि त्याचे वडील  नागार्जुन (Nagarjuna) यांची जोडी ही नेहमी चर्चेत असते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील या दोघांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांबरोबरच जाहिरातींमध्ये देखील नागार्जुन आणि नागा चैतन्य यांनी एकत्र काम केले आहे. रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि नागार्जुन यांची एकूण संपत्ती ही 1 कोटी एवढी आहे. त्यांच्याकडे लग्झरी कारचे कलेक्शन देखील आहे. 

नागार्जुन आणि नागा चैतन्य यांचे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन नागार्जुन आणि नागा चैतन्य यांच्याकडे बीएमडब्लू सीरिज 7 गाडी आहे. या गाडीची किंमत 1.5 कोटी आहे. बीएमडब्लूबरोबच त्यांच्याकडे ऑडी ए 7 ही गाडी आहे ज्याची किंमत 90 लाख रूपये आहे. बीएमडब्लू एम 6 ही 1. 75 कोटींची गाडी देखील या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये आहे.रेंज रोव्हर वॉग हगी दोन कोटींची आलिशान गाडी नागार्जुन आणि नागा चैतन्य यांच्याकडे आहे. तसेच रेंज रोवर ऑटोबायोग्राफी (2.18 कोटी)हे गाडी देखील त्यांच्याकडे आहे. 

अभिनेता नागा चैतन्य हा लाल सिंह चड्ढा या चित्रपटामध्ये काम करणार आहे. या चित्रपटात तो बाला नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha