Jersey Release Date : क्रिकेटप्रेमी आणि सिनेरसिक गेले अनेक दिवस शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' (Jersey) सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 31 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 14 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
मागील काही दिवसांपासून 'जर्सी' सिनेमातील गाणी आणि पोस्टर रिलीज होत असल्याने या सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होईल अशीदेखील शक्यता वर्तवली जात होती. पण आता हा सिनेमा 14 एप्रिलला सिनेमागृहातच प्रदर्शित होणार आहे.
'जर्सी' हा टॉलिवूड सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. सिनेमात पंकज कपूरसोबत मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
संबंधित बातम्या
Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' सिनेमाची रिलीज बदलली, 'या' दिवशी होणार सिनेमा प्रदर्शित
Oscar Awards 2022 : यंदाचा ऑस्कर खास, चाहते ट्विटरद्वारे करू शकतात मतदान
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'Jab Saiyaan' गाणे रिलीज, बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha