Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) वाराणसीच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता याप्रकरणी भोजपुरी गायक आणि आकांक्षाचा खास मित्र समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने समर सिंह आणि संजय सिंहविरोधात तक्रार दाखल केली आहे". 


आकांक्षाच्या आईने तक्रार दाखल केली


वाराणसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षाच्या आईने समर सिंह आणि संजय सिंह या दोन व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. आकांक्षाने वाराणसीतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आकांक्षाने एका पार्टीला हजेरी लावली होती. हॉटेलमध्ये आल्यानंतर काही वेळ ती रडत होती. आकांक्षाच्या बाबतीत नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे". 


समर सिंह आणि संजय सिंहवर आकांक्षाच्या आईचे गंभीर आरोप


आकांक्षाच्या आईने समर सिंह आणि त्याच्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. समर आणि संजयने आकांक्षाचा छळ केल्याचा तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. 21 मार्च 2023 रोजी आकांक्षा आणि समर सिंहचा भाऊ संजय यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर त्याच्या भावाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गायक समर सिंह आणि आकांक्षा दुबे रिलेशनमध्ये होते. 


मेकअप आर्टिस्टने पोलिसांना दिली माहिती


25 वर्षीय आकांक्षा दुबे ही आगामी सिनेमाच्या शुटिंगसाठी वाराणसीला गेली होती. शुटिंगदरम्यान ती सारनाथ येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आकांक्षाने गळफास घेतल्यानंतर तिच्या मेकअप आर्टिस्टने तिला पहिल्यांदा त्या अवस्थेत पाहिलं आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती देताना मेकअप आर्टिस्ट म्हणाला,"मी आकांक्षाच्या खोलीचा दरवाजा ठोठावला पण तिने उघडला नाही. त्यानंतर मी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला बोलावलं आणि आकांक्षाने आत्महत्या केल्याची माहिती दिली". 


टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. 


संबंधित बातम्या


Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य; आयपीएस अधिकारी होण्याचं वडिलांचं स्वप्न अपूर्णच