Ajay Purkar : मराठा आरक्षणाचं वादळ हे आता मोठ्या पडद्यावरही साकारलं जाणार आहे. अंतरवाली सराटीमधून मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) हाक संपूर्ण देशात पसरली. यामध्ये मनोज जरांगे पाटील हे नाव अग्रस्थानी आहे. याच मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांचा लढा आता मोठ्या पडद्यावरही येणार आहे. 'आम्ही जरांगे' या सिनेमातून गरजवंत मराठ्यांचा लढा पाहायला मिळणार आहे. यामध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत अजय पुरकर (Ajay Purkar) दिसणार आहे. 


'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा'  या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, सुबोध भावे,  प्रसाद ओक,  अजय पुरकर,  विजय निकम,  कमलेश सावंत,  भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे आदी कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे.    


सिनेमाचा नवा प्रोमो रिलीज


मराठा आरक्षणासाठी पहिले हुतात्मे अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत अजय पुरकर दिसणार आहे. मराठा आंदोलनाची पहिली हाक मारणाऱ्या या नेत्याचा ज्वलंत इतिहास आता रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. तसेच या सिनेमात मनोज जरांगे यांच्या भूमिकेत अभिनेते मकरंद देशपांडे दिसणार आहेत.              


'आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा' या चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे. नारायण प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर  चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार असल्याचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी म्हटले.   






ही बातमी वाचा : 


Majhi Tuzi Reshimgath : यश आणि समीरची जोडी पुन्हा एकत्र, माझी तुझी रेशीमगाठचा दुसरा भाग येणार?