Ajay Devgn, nysa : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या त्याच्या रन-वे-34 (Runway 34) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स अभिनय क्षेत्रात करिअर करतात. अजय देवगणची मुलगी न्यासा ही देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. आता अजयनं न्यासाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये अजला प्रश्न विचारण्यात आला की, 'न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का?' या प्रश्नाला अजयनं उत्तर दिलं की, 'अभिनय क्षेत्रात काम करायची सध्या तिला इच्छा नाहिये. न्यासा या क्षेत्रात करिअर करेल की नाही, हे मला माहित नाही. '
अजय आणि काजोलची मुलगी न्यासा ही सध्या 18 वर्षाची आहे. ती शिक्षणासाठी सिंगापूर येथे गेली होती. आता ती स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे.काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
अजय आणि काजोलची लव्ह स्टोरी
अजय आणि काजोलच्या रोमँटिक केमिस्ट्रीला त्यांच्या चाहत्यांची पसंती मिळते. 1999 मध्ये काजोल आणि अजयने लग्नगाठ बांधली. त्यांची लव्ह स्टोरी देखील फिल्मी आहे. 'हलचल' चित्रपटाच्या शुटींगवेळी हे दोघेही जवळ आले. त्यानंतर चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांचेही लग्न झाले.
हेही वाचा :
- Aai Kuthe Kay Karte : ‘तो अनिरुद्धला अन्या म्हणाला अन् अनिरुद्ध फेमस झाला!’, मिलिंद गवळींची ‘या’ अभिनेत्याची खास पोस्ट!
- Runway 34 Trailer : लोकांचा जीव वाचवणारा कॅप्टन विक्रम कसा ठरला दोषी? ‘रनवे 34’मधून अजय देवगण सांगणार थरारक कथा!
- Johnny Depp, Amber Heard : पती जॉनी डेपवर 10 कोटींचा दावा ठोकला, आता अभिनेत्री एम्बर हर्ड म्हणतेय...