Ajay Devgn Manidaan : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याचा बहुप्रतिक्षित 'मैदान' या सिनेमाची रिलिज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आता एप्रिल महिन्यात ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणचा चाहता वर्ग मोठा आहे. गेल्या 3 दशकांपासून तो बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अजय देवगणच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. हा सिनेमा 1 वर्षापूर्वीच प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रत्येकवेळी कोणत्यातरी कारणामुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. मात्र, आता हा सिनेमा एप्रिलमध्येच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, हा सिनेमा या वर्षीच्या ईद दिवशी रिलीज होणार आहे. तरण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरुन ही माहिती दिली आहे. अजयच्या या सिनेमाचे पोस्टर त्यांनी शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगण सिरियस लूकमध्ये दिसत आहे. पोस्टरमध्ये त्याच्या शेजारी अनेक लोग पाहायला मिळत आहेत. तरणने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. 






मैदान चित्रपट कशावर आधारित?


अजय देवगणचा मैदान हा चित्रपट बोयग्राफी आहे. एका खेळाडूची ही कहाणी आहे. बोनी कपूरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात इंडियन फुटबॉलच्या सुवर्णकाळातील आहे. मैदानात अजय देवगण फुटबॉलच्या कोच सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका निभावताना दिसत आहे. सिनेमात मी अजय देवगणच्या समवेत दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणई, नितांशी गोयल, आमिर अली शेख, भरत जयराम, आर्यन भौमिक, गजराज राव, रुद्रनील घोष, रोहित मंडल, ऋषभ जोशी, डिएगो टोरेस कुरी, जीएण टोनॉय, अमर्त्य रे, मधुर मित्तल आणि कृष्णा सजनानीही भूमिकेत दिसणार आहेत. 


तर दुसरीकडे आणखी एका चित्रपटाची चर्ची सुरु झाली आहे. या वर्षीच्या ईद दिवशीच आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘छोटे मियां बड़े मियां’हा सिनेमाही त्याच दिवशी रिलीज होणार आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्यामध्ये सिनेमावर एकप्रकारे सामनाच रंगणार आहे. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Nayanthara Controversies : सरोगसी, प्रायव्हेट फोटो व्हायरल ते 'राम मांसाहारी होता' ; नयनतारा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात