Nayanthara Controversies : दाक्षिणात्य अभिनेत्री नयतारा (Nayanthara) सध्या तिच्या सिनेमातील एका संवादामुळे वादात अडकली आहे. 'राम मांसाहारी होता' अशा आशयाचा संवाद तिच्या अन्नपूर्णी या चित्रपटात घेण्यात आला होता. त्यानंतर सिनेमाच्या निर्मात्यांसह नयतारावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नयनताराने (Nayanthara) याबाबत माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, नयताराला (Nayanthara) वाद नव्हे नाहीत. यापूर्वीही नयनतारा (Nayanthara) अनेक वादांमध्ये अडकली आहे. जाणून घेऊयात... 


सरोगसी आणि नयनतारा (Nayanthara) 


नयनतारा सिनेमासोबत तिच्या व्यक्तीगत आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री नयताराने 2022 मध्ये विग्नेश शिवन याच्याशी विवाह केला होता. मात्र, विवाहाच्या काही काळानंतर या जोडप्याने सरोगसीमार्फत जुळ्या मुलांना जन्म दिला. उयिर आणि उलाग असे या मुलांचे नाव आहेत. त्यानंतर सरोगसीच्या कायद्याच्या उल्लंघनावरुन मोठा वाद सुरु झाला. मात्र, तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने समोर येऊन स्पष्ट केले की, नयनताराने कोणत्याही कायद्यांचे उल्लंघन केलेले नाही. 


तामिळ सिनेमांत नयनताराला होती बंदी (Nayanthara) 


नयनतारा दाक्षिणांत्य सिनेमातील दिग्गज अभिनेत्री आहे. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, तिच्यावर इंडस्ट्रीने बंदी घातली आहे. नयनताराने कार्थी स्टारचा सिनेमा 'पैय्या'च्या निर्मात्यांशी सहकार्य केलं नव्हते. त्यामुळे नयनतारावर ही बंदी घालण्यात आली होती. एवढेच नाही. तर निर्मात्यांनी दावा केला होता की, नयनताराने 20 लाख रुपये अॅडव्हान्स घेतला होता, हे पैसे देखील परत करण्यास नयनताराने नकार दिला होता. 


तिरुपती मंदिरात चप्पल घालून पोहोचली


नयनताराने विग्नेश शिवनशी विवाह केल्यानंतर नयनतारा (Nayanthara) तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी नयनतारा बुट घालून मंदिरात दाखल झाली होती. त्यामुळे अभनेत्रीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते. दरम्यान या वादावर नयनताराने माफी मागून पडदा टाकला होता. 


नयनतारा आणि प्रभुदेवाचाही वाद (Nayanthara) 


एकेकाळी नयनतारा डान्सर प्रभुदेवाच्या प्रेमात पडली होती. दोघांच्या प्रेम प्रकरणाबाबत त्यावेळी तुफान चर्चा सुरु होती. नयनताराने (Nayanthara) प्रभुदेवाच्या पत्नीशी लग्न करण्यासाठी परवानगी मागितली होती, असा दावाही काहीजण करतात. दरम्यान, हे प्रकरण पोलिसांपर्यंत देखील पोहोचले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Hanuman Cinema and Ram Mandir : हनुमान सिनेमाच्या निर्मात्यांनी राम मंदिरासाठी 2.6 कोटी केले दान