Actress Rajeshwari Kharat : अभिनेत्री राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने गणपती बाप्पासोबतचा फोटो शेअर करत सर्वांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, काही लोकांनी तिचं या फोटोवरुन देखील ट्रोलिंग सुरु केलं होतं. अनेकांनी राजेश्वरी खरातचं धर्मावरुन देखील ट्रोलिंग सुरु केलं. या सर्व ट्रोलिंगला राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) हिने फेसबुक पोस्टवरील कमेंटने प्रत्युत्तर दिलं आहे. राजेश्वरी खरात (Actress Rajeshwari Kharat) काय काय म्हणाली जाणून घेऊयात...
अभिनेत्री राजेश्वरी खरातची कमेंट जशीच्या तशी
राजेश्वरी खरात म्हणाली, 🤦🏻♀️😂 comments "OMG"... बुद्धिमत्ता, विचार, परिस्थिती, संस्कार, अपयश, जातिभेद, धर्मभेद सर्व एकत्र पाहायला मिळाले. मला कोणीतरी सांगितले होते की आयुष्यात कधीही धर्म आणि राजकारण यांविरोधात बोलू नकोस, ते आज समजले का. आडनावावरून धर्म आणि राजकारणातून मैत्री ठरवली जाते. आयुष एकदाच आहे त्यातसुद्धा मनुष्य किती वाटल्या गेला आहे देवाधर्माच्या नावाखाली. लक्षात घ्या मंदिर, मस्जिद, चर्च या ठिकाणी देव कधी भेटणार नाहीत कारण हे सर्व देवाने नाही आपणच बनवले आहे. कोणी भक्ती भावनेने तर कोणी व्यावसायिक दृष्टिकोनाने. यावरून अनेकदा कित्येक राजकारणी तुमच्या भावनेशी खेळून जातात त्यामुळे दंगे होतात लोकांचे जीव जातात तरी कोणाला फरक पडला नाही. आणि हे सर्व करून दरवर्षी आपन आपले सण आनंदाने साजरे करतो पण कोणासाठी? चांगले कर्म करत चला, कदाचित या उत्सवांपेक्षा तुमचे कर्म देवाला आवडतील. 🙏🏻❤️💕
अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या तिच्या मखमली या गाण्यामुळे चर्चेत आहे. लवकरच तिचा कलवरी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याआधी या चित्रपटातील मखमली हे गाणं प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांकडून याला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. या गाण्यात राजेश्वरीने आतापर्यंतचे सर्वाधिक रोमँटिक सीन दिलेले पाहायला मिळतात.
मखमली या गाण्याचे शब्द प्रदीप बी. टोंगे यांनी लिहिले असून, याला स्वर ओंकार स्वरूप यांनी दिला आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी प्रदीप बी. टोंगे आणि मंगेश वैजिनाथ शेंडगे यांनी मिळून पार पाडली आहे. गाण्याचा टीझर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर याला जोरदार प्रतिसाद दिला होता. या गाण्यात राजेश्वरीसोबत अभिनेता राहुल दराड याचाही खास डान्स पाहायला मिळतो. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या नदीकाठावर या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या