Amit Shah मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा, अशासूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना दिल्याआहेत. विधानसभेप्रमाणे भाजपची कामगिरी असायला हवी, मुंबईसह इतर प्रमुख महानगरपालिकाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, असा कामंत्रदेखील अमित शाह (Amit shah) यांनीराज्यातीलभाजपच्याप्रमुखांनादिल्याचीमाहितीआहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आले असता राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांची चर्चा झाली. त्यानंतर, मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन ते मुंबईतून गुजरातच्या दिशेने रवाना झालेत. त्यापूर्वीत्यांनीघेतलेल्याभाजपच्याविशेषबैठकीत अमित शाहयांनी भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना आगामीनिवडणुकांच्याअनुषंगाने सूचना दिल्यात. तसेचयावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांकडून आगामी निवडणुकांचा आढावा अमित शाहांनी घेतला. सद्यस्थितीला भाजपच्या मुंबईत किती जागा निवडून येतील याचाही आढावा घेण्यातआलाय.

ही बातमी वाचा: