Actress Rajeshwari Kharat : मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने आज बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केला आहे. बाप्तिस्मा (Baptism) हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. Baptism द्वारे एखादी व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते. दरम्यान, राजेश्वरीने बाप्तिस्मा हा विधी पूर्ण केल्यानंतर सोशल मीडियावर राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याची चर्चा सुरु झाली होती. अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावर होतं असलेल्या ट्रोलिंगला राजेश्वरी खरातने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय.
सोशल मीडियावरील ट्रोलिंगला राजेश्वरी खरातचं प्रत्युत्तर
राजश्वरी खरातने फेसबुकवर लिहिलं की, 😂निवडणुका, प्रत्येकी 500 रुपये, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण, आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे...हे आज धर्म/जात शिकवायला आले आहेत, तुमचे स्वागत आहे. कोणी पैश्यांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे. टीप :- माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे, आणि मी सर्व धर्मांचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्विकारली जावी एवढी विनंती. 😊🙏🏻
राजेश्वरी खरात ही एक प्रतिभावान मराठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फँड्री' या चित्रपटातील 'शालू' या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. तिच्या अभिनयामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीतील एक ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. राजश्वरी खरातने इयत्ता नववीत असताना अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. तिने शालेय शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. पुढे तिने सिंहगड महाविद्यालयातून B.Com पदवी प्राप्त केली
राजेश्वरीने 'फँड्री' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिने 'शालू' ही भूमिका साकारली, ज्यामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर तिने 'पुणे टू गोवा' आणि 'आयटमगिरी' (2017) या चित्रपटांमध्येही काम केले .
इतर महत्त्वाच्या बातम्या
शालूने धर्म बदलला?, नव्या धर्माची स्वीकृती, फोटो पोस्ट करत राजेश्वरी खरातची माहिती!