Actress Rajeshwari Kharat : मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सोशल मीडियावर तिचा बाप्तिस्मा झाला असल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची चर्चा सुरु झाली आहे. फँड्री सिनेमातून शालू या पात्रातून महाराष्ट्रात ओळख निर्माण केलेल्या राजेश्वरी खरातने तिच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरुन 'Baptised ❤️' असं कॅप्शन लिहित फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, राजेश्वरी खराने पूर्ण केलेला Baptism हा विधी काय असतो? जाणून घेऊयात... 

Continues below advertisement

Continues below advertisement

बाप्तिस्मा (Baptism) हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. Baptism द्वारे एखादी व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते.​

बाप्तिस्मा म्हणजे काय?

"बाप्तिस्मा" हा शब्द ग्रीक भाषेतील "बॅप्टिझो" या शब्दापासून आला असल्याची माहिती आहे. बाप्तिस्मा चा अर्थ "बुडवणे" किंवा "पाण्यात बुडवणे" असा होतो . या विधीत, व्यक्तीला पवित्र पाण्यात पूर्णपणे बुडवले जाते किंवा डोक्यावर पाणी शिंपडले जाते, ज्याद्वारे तिच्या पापांची क्षमा होते आणि ती नवीन आध्यात्मिक जीवनाची सुरुवात करते.​

बाप्तिस्माचे ख्रिस्ती धर्मातील महत्त्व

येशू ख्रिस्ताची आज्ञा: येशूने आपल्या अनुयायांना सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य बनवून त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा दिली होती .​ पापमुक्ती आणि नवीन जीवन : बाप्तिस्मा घेतल्याने व्यक्तीचे पाप क्षमिले जातात आणि ती आध्यात्मिकदृष्ट्या नवीन जीवनात प्रवेश करते.​

ख्रिस्ताशी एकरूपता: बाप्तिस्मा हा ख्रिस्ताच्या मृत्यू, गाडले जाणे आणि पुनरुत्थान यांचे प्रतीक मानला जातो.​

बाप्तिस्माची प्रक्रिया

विश्वासाची घोषणा : व्यक्ती येशू ख्रिस्तावर आपला विश्वास जाहीर करते.​

पवित्र पाण्याचा वापर : पाद्री किंवा धर्मगुरूच्या उपस्थितीत पवित्र पाण्याने बाप्तिस्मा दिला जातो.​

प्रार्थना आणि आशीर्वाद : बाप्तिस्मा दरम्यान विशेष प्रार्थना केल्या जातात आणि आशीर्वाद दिला जातो.​

बालक बाप्तिस्मा

काही ख्रिस्ती संप्रदायांमध्ये बालकांना बाप्तिस्मा दिला जातो, ज्याद्वारे ते ख्रिस्ती समुदायात सामील होतात. या प्रक्रियेत पालक आणि गॉडपॅरंट्स (धर्मपालक) बालकाच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाची जबाबदारी घेतात. 

कोण आहे राजेश्वरी खरात?

राजेश्वरी खरात ही एक मराठी अभिनेत्री आहे.  नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फॅंड्री' (2013) या चित्रपटात राजेश्वरीने 'शालू'ची भूमिका साकारली होती. यानंतर तिला शालू म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. राजेश्वरी खरात ही पुण्याची राहिवासी आहे.  अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना ती नववीत शिकत होती.

राजेश्वरीने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात 'फॅंड्री' (2013) या चित्रपटातून केली. या चित्रपटात तिने 'शालू' या उच्चवर्णीय मुलीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी विशेष कौतुक केले. त्यानंतर तिने 'पुणे टू गोवा' आणि 'आयटमगिरी' (2017) या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय, 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मन उधाण' या मराठी गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्येही ती झळकली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शालूने धर्म बदलला?, नव्या धर्माची स्वीकृती, फोटो पोस्ट करत राजेश्वरी खरातची माहिती!