Actress Rajeshwari Kharat : मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने आयुष्यातील मोठा निर्णय घेतलाय. Baptised पूर्ण झाला असल्याची माहिती तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिलीये. म्हणजेच तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती दिली आहे. राजेश्वरी खरात ही दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री या सिनेमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तिने फँड्री सिनेमातून चाहत्यांची मने जिंकली. 'जब्याची शालू', ही ओळख तिला या सिनेमातून मिळाली. 

दरम्यान, अभिनेत्री शालूने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तिला काही सकारात्मक तर काही नकारात्मक कमेंट्सना सामोरे जावे लागत आहे. राजेश्वरीने याबाबत सविस्तर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, तिने Baptised चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

कोण आहे राजेश्वरी खरात? 

राजेश्वरी खरात ही एक मराठी अभिनेत्री आहे, जिला दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फँड्री (2013) या चित्रपटातील 'शालू' या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली. राजेश्वरीने आपल्या अभिनयाची सुरुवात फँड्री चित्रपटातून केली, ज्यामध्ये तिने एका उच्चवर्णीय मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट जातीभेदावर आधारित असून, एका तरुणाची प्रेमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे.  या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळवले.​

राजेश्वरी खरातने फँड्री या सिनेमाशिवाय इतर काही महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये देखील काम केलं आहे. ‘फँड्री’ नंतर तिने काही मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. पुणे टू गोवा (2014) हा तिचा विनोदी शैलीतील चित्रपट आहे. आयटमगिरी (2017) या युवकांच्या जीवनशैलीवर आधारित असलेल्या हलकाफुलक्या चित्रपटात देखील तिनं काम केलं होतं. काही लघुपट आणि शॉर्ट फिल्म्समधूनही तिने आपला अभिनय कौशल्य दाखवलं होतं.

दरम्यान, फँड्री या सिनेमाशिवाय दुसऱ्या कोणत्याही फिल्ममध्ये तिला मोठं यश मिळालं नाही. मात्र राजेश्वरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहिली आहे. दरम्यानच्या काळात तिला जाहिरातींचे प्रोजेक्ट मिळत राहिले आहेत. राजेश्वरी खरात सोशल मीडियावर सातत्याने तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना पाहायला मिळाली. शिवाय तिने अनेकदा चाहत्यांच्या कमेंट्सना मजेशीर उत्तरं देखील दिली आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Malavika Mohanan Assault: 'एक चुम्मा देगी क्या?', अभिनेत्रीनं सांगितला मुंबई लोकलमधला हादरवणारा किस्सा , छेडछाडीचा भयानक अनुभव!