पुणे: राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे. महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे, तर विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्यात काल (शुक्रवारी) जळगावमध्ये येथे 8.9 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यामध्ये 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. राज्यातही थंडी हळूहळू वाढू लागली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात तीन दिवसांपासून गारठा चांगलाच वाढला आहे. (Maharashtra Weather Updates)
उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. हिमालयापासून ते मध्य भारतापर्यंतचा भाग थंडीने गारठला आहे. जम्मू, काश्मीर, लद्दाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील बहुतांश भागांत पारा 1 ते 5 अंशांपर्यंत खाली आला आहे. या भागातून राज्यात शीतलहरी येण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. थंडीची लाट राज्यात सक्रिय झाली असून, 14 ते 18 डिसेंबर या कालावधीत ही लाट अधिक तीव्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही आगामी 12 ते 24 तासांत गारठा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.(Maharashtra Weather Updates)
काल (शुक्रवारी), धुळ्यात राज्यातील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. कमाल तापमान 6 अंश सेल्सियअची नोंद करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा वाढताना दिसत आहे. दिवसभर देखील हवेत गारवा जाणवू लागला आहे. तर, संध्याकाळी तापमानाचा पारा घसरत असल्याने गारठ्यात वाढ होत आहे. धुळे, परभणी, गडचिरोली आदी ठिकाणी किमान तापमानाचा पारा 10 अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे.उत्तर भारतातून शीतलहरी येत असल्याने अनेक राज्यातील बहुतांश भाग गारठू लागले आहेत. काल (शुक्रवारी) उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. हिमालयापासून ते मध्य भारतापर्यंतचा भाग थंडीने गारठला आहे. जम्मू, काश्मीर, लद्दाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत.(Maharashtra Weather Updates)
पुणे शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला
पुणे शहरासह संपूर्ण जिल्हात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे, शुक्रवारी शहराचे किमान तापमान 12.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. आगामी पाच दिवस शहराच्या तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील किमान तापमानात गेल्या 12 तासांत घट सुरू झाली असून, काही भागांतील पारा 11 अंशांवर खाली आला आहे. यात शहरातील एनडीए 11, हवेली 11.4, शिवाजीनगर 12.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे.