Maharashtra Temperature Update: राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. गोंदियात आज 6.9 अंश सेल्सियस तापमानची नोंद झाल्यानं नागरिक कुडकुडले आहेत. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलय. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन एकीकडे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले असून दुसरीकडे मात्र रब्बी हंगामाच्या पिकांसाठी ही थंडी फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी  शेकोट्या पिढीपासून उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. पहा आज कुठे कसे तापमान आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद झाली याची माहिती दिली आहे. वाचा सविस्तर तापमान अपडेट.

कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?

जिल्हा TEMP MAX ('C) TEMP MIN ('C)
अहमदनगर 27.9 9.5
अहमदनगर 26.1 10.4
अहमदनगर 14.7  
डीआयडी 29.8  
औरंगाबाद 29.4 14.4
मणी 7  
मणी 11.0  
भंडारा 26.1 8.1
चंद्रपूर 29.9 12.4
धुळे 29.2 10.5
गोंदिया    
गोंदिया 26.3 6.9
हिंगोली 27.0  
हिंगोली 9.8  
जळगाव    
जळगाव 17  
जालना 27.4 12.4
कोल्हापूर 29.1 16.5
आळशी 30.1 14.0
आळशी 15.2 21.0
मुंबई_सिटी 31.2 23.0
मुंबई_सिटी 32.6 21.6
नागपूर 26.2 10.2
नागपूर 26.1  
नांदेड 28.5 12.9
नांदेड 26.7 14.4
नंदुरबार 26.7 10.8
नंदुरबार 29  
नंदुरबार 7.2  
नाशिक 25.7 8.2
नाशिक 25.8 14.1
उस्मानाबाद 33  
उस्मानाबाद 28.2 15.3
पालघर 32.4 15.9
परभणी 12.1 10.7
पुणे 26.6 11.0
पुणे 29.9 11.6
पुणे 28.7 12.3
पुणे 30.6 14.5
पुणे 28.9 17.2
पुणे 28.9 10.0
पुणे 27.6 8.6
पुणे 27.5 11.4
पुणे 27.8 10.4
पुणे 29.2 9.8
पुणे 31.6 11.1
पुणे 33.1 10.7
रायगास 33.4 13.9
रायगास 27.7  
रत्नागिरी 51  
रत्नागिरी    
रत्नागिरी 23.5  
सांगली 30.0 12.9
सातारा 23.6 12.8
सिंधुदुर्ग 35.2 22.0
सोलापूर 30.8 10.5
सोलापूर 29.7 13.0
सोलापूर 33.3 16.2
वर्धा 28.4  
वाशिम 10.5  
यवतमाळ 7.1  
यवतमाळ 26.9 11.2

उत्तरेतून शीतलहरी महाराष्ट्रात

उत्तर भारतातून राज्यात शीतलहरी वेगाने येत आहेत, त्यामुळे राज्यातील बहुतांश भाग गारठू लागला आहे. शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. हिमालयापासून ते मध्य भारतापर्यंतचा भाग थंडीने गारठला आहे. जम्मू, काश्मीर, लद्दाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली आहेत. राजस्थानातील बहुतांश भागांत पारा 1 ते 5 अंशांपर्यंत खाली आला आहे. या भागातून राज्यात शीतलहरी येण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारी राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील किमान तापमान 9 ते 10 अंशांवर खाली आले होते. 

हेही वाचा:

राज्यात गारठा वाढला! जळगावमध्ये 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, जाणून घ्या कसं असणार हवामान