Actress Nagma Affair Rumours : सिनेसृष्टीतल्या अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांचं स्थान निर्माण केलं आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांमुळे या अभिनेत्री कायमच चर्चेत आल्या आहेत. या अभिनेत्रींनी सुपरहिट चित्रपट दिलेच, पण प्रेक्षकांच्या  मनावरही राज्य केलं. जितकी या अभिनेत्रींच्या कामाची चर्चा झाली तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा झाली. अशाच एका दर्जेदार अभिनेत्रीच्या अफेअरच्या देखील बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. यामधील एक तर भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार होता. पण तरीही आज ही अभिनेत्री अविवाहितच आहे. 


अभिनेत्री नगमा (Actress Nagma) हिने हिंदी, दाक्षिणात्य तसेच भोजपुरी इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची छाप पाडलीये. जितकी तिच्या अभिनयाची चर्चा झाली तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा झाली. बॉलीवूडमध्ये ज्या सुंदर अभिनेत्रींचं नाव घेतलं जातं, त्यामध्ये नगमाचं नावंही आवर्जुन घेतलं जातं. हिंदी सिनेसृष्टीतं तिने बॉलीवूडचे सुपरस्टार सलमान, शाहरुख यांच्यासह अनेक स्टार्ससह काम केलंय. तसेच तिने साऊथमध्ये रजनीकांतसोबतही स्क्रिन शेअर केलीय. तसेच तिने त्यानंतर भोजपुरी चित्रपटांमध्ये आपल्या अभियनाची छाप सोडलीये. तिने तिच्या कारकिर्दीमध्ये एकूण 81 चित्रपट केलेत. 


नगमाच्या अफेअर्सच्या चर्चा


नगमाच्या अभिनयाचे जितके चाहते होते, तितकेच तिच्या सौंदर्यावरही भाळणारे अनेक होते. पण तरीही आजही ही अभिनेत्री अविवाहितच आहे. म्हणूनच या अभिनेत्रींच्या अफेअर्सच्या चर्चा जास्त रंगतात. सुरुवातीला नगमाचं नावं भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीबरोबर जोडलं गेलं होतं. जेव्हा या सगळ्या चर्चा सुरु होत्या तेव्हा सौरव गांगुली हा विवाहित होता. पण नगमा अविवाहित होती. तरीही या दोघांनाही यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. 


प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत चर्चा


नगमाने भोजपुरी सिनेसृष्टीत रवीकिशन आणि मनोज तिवारी यांच्यासह स्क्रिन शेअर केली आहे. त्यावेळी रवीकिशन आणि मनोज तिवारी यांच्यासोबत देखील नगमाच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. या दोघांसोबत नगमाची जोडी सुपरहिट ठरली होती. त्यामुळे त्यांच्यासोबतही नगमाच्या अफेअर्सच्या चर्चा होत्या. मनोज तिवारींनी यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्यावेळी रवीकिशन यांच्या प्रतिक्रियेची बरीच चर्चा झाली होती. नगमासोबतच्या अफेअरसोबत त्यांनी म्हटलं होतं की, मला नगमा खूप आवडते पण मी विवाहित आहे, असं रवीकिशन यांनी म्हटलं होतं. 


ही बातमी वाचा : 


Aai Kuthe Kay Karte :'आई कुठे काय करते' मालिका का बंद होत नाही? मालिकेच्या नव्या प्रोमोनंतर चॅनल हेड सतीश राजवाडेंनी स्पष्ट कारणच सांगितलं