प्रचंड तणावामुळे अभिनेत्रीचं वजन घटलं!

तुम्ही कायम ऐकलं असेल की, जास्त टेन्शन घेतल्यानं वजन कमी होतं. पण या अभिनेत्रीचं खरोखरच तणावामुळे प्रचंड वजन कमी झालं आहे.
फोटो: इंस्टाग्राम
दोघांच्या वयामध्ये 22 वर्षाचं अंतर आहे. दोघांनी 2014 साली लग्न केलं होतं.
अंबरनं चित्रपट 'पाइरेट्स ऑफ द कैरेबियन'चा अभिनेता जॉनी डेपविरोधात घरगुती छळाचा आरोप करत मागील महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
वेबसाईट टीएमझेड डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, अंबर या आठवड्यातं आपला आगामी सिनेमा 'जस्टिस लीग'च्या कॉस्ट्यूम फिटिंगसाठी लंडनला जाणार होती. पण तिचा हा दौर कथित स्वरुपात रद्द करण्यात आली. कारण की, निर्मात्यांना वाटलं की, तिचं वजन प्रचंड कमी झालं आहे. असं सांगितलं जातं की, तणावामुळे अंबरचं तब्बल ९ किलो वजन कमी झालं आहे.
अमेरिकन अभिनेत्री अंबर हर्डचं तणावामुळे खूपच वजन कमी झालं आहे. तिचा पती जॉनी डेपसोबत घटस्फोटाची प्रकिया सुरु आहे. याच सर्व प्रकियेत ती प्रचंड तणावाखाली होती.
तुम्ही कायम ऐकलं असेल की, जास्त टेन्शन घेतल्यानं वजन कमी होतं. पण या अभिनेत्रीचं खरोखरच तणावामुळे प्रचंड वजन कमी झालं आहे.