नुकतंच द रिचेस्ट नावाच्या एका पोर्टलने जगातील अशा दहा वॉरियर्सची लिस्ट घोषित केली आहे, ज्यांच्याशी कुणी पंगा घेऊ नये. या लिस्टमध्ये विद्युत जामवालनं आपलं स्थान पक्कं केलं आहे. या यादीत विद्युत सोबत रशियाचे राष्ट्रपति व्लादिमिर पुतिन आणि द मेन वर्सेज वाइल्डचे होस्ट बेअर ग्रिल्ससारखी नावं आहेत. या यादीत विद्युत एकमेव भारतीय आहे.
ही यादी घोषित होताच विद्युतनं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये तो म्हणतो की, ''बेअर ग्रिल्सला पाहतो आणि फॉलोही करतो, आपले हे अद्वितीय साहस कौतुकास्पद असतं. अशक्य गोष्टी तुम्ही सहजपणे शक्य करुन दाखवता. तुम्हीच खरे ब्लू वॉरिअर आहात, ज्यांच्याशी कुणी पंगा घेऊ नये.''
ही आहे टॉप 10 लिस्ट
या टॉप 10 लिस्टमध्ये विद्युत जामवालसह व्लादिमीर पुतिन, चीनचे मोंक शिफू शी यन, विटो पिरबजारी, गीगा उगुरु, हट्सुमी मसाकी, जेडी एंडरसन, मुस्तफा इस्माईल, मार्टिन लिचिस, बेयर ग्रिल्स यांचा समावेश आहे.
रशियाची कमान 2036 पर्यंत पुतीन यांच्याकडेच; जनतेची जनमत चाचणीतून मान्यता
विद्युत जामवालचे दोन सिनेमे लवकरच OTT प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होणार आहेत. विद्युतने अभिनय केलेला ''खुदा हाफिज'' लवकरच हॉटस्टारवर रिलीज केला जाणार आहे. यासोबतच तो श्रुती हासन, अमित साध, विजय वर्मा, केनी बसुमतरी आणि संजय मिश्रासोबत 'यारा' मध्येही दिसेल. हा 2011 च्या एका फ्रेंच सिनेमा "अ गैंग स्टोरी" चा रिमेक आहे. हा सिनेमा झी 5 वर रिलीज होणार आहे.