Swapnil Joshi : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र आषाढी ए्कादशीचा माहोल आहे. माऊली माऊलीच्या गजरात प्रत्येक जण या वारीमध्ये सहभागी होत विठुरायाच्या भेटीत रंगून गेले आहेत. प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) यानेही वाखरी ते पंढरपूर अशी पायी वारी करत आपल्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूर्तीला प्रारंभ केला. ‘वारीचा हा प्रवास प्रत्येकाने एकदा तरी करावाच.. तुम्ही वारी चालला नाहीत, तर तुम्ही जिवंत न्हाईत!’, असे माझी आजी म्हणायची. ती असे का म्हणायची त्याची अनुभूती मला काल झाली. काल वारकऱ्यांना भेटून, त्यांच्या बरोबर चालून, खेळून, नाचून, फुगड्या घालून, माऊलीचा जयघोष करत मंदिर कधी आलं ते कळलंच नाही, अशा शब्दात स्वप्नीलने आपला अनुभव कथन केला.


स्वप्नील म्हणाला की, आम्ही पिक्चरमधील हिरो असलो तरी खरे हिरो हे वारकरीच. वर्षनुवर्ष तहान भूक विसरून, पायी वारी चालतात. पायाला सूज येते, पण मानाची, विचारांची सूज कायमची निघून जाते. त्यांचे आशीर्वाद घेऊन धन्य वाटले.



वारकऱ्यांच्या सेवेतही सहभागी


या वारीमध्ये 1 ओटीटीचे नरेंद्र फिरोदीया, विनायक सातपुते, विनायक श्रीनिवासन आणि आमच्या टीमने जे काम केले आहे, करत आहेत, मग ते अन्नदान असेल, बसायची,पाण्याची सोय असेल, पत्राशेड असेल, लॉस्ट अँड फाऊंड स्टॉल असतील. ते पाहून खूप आनंद झाला. मनोरंजन करता करता समाज सेवा करता येत आहे याचा एक वेगळा अनुभव मिळाला आणि आनंद वाटला, असेही स्वप्नीलने सांगितले.


1ओटीटी हा भारत का अपना मोबाईल ओटीटी असून त्याची सुरुवात स्वप्नील जोशी आणि प्रख्यात उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी संयुक्तपणे केली आहे. जानेवारी महिन्यात याच्या लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. 1ओटीटी हे एक ओटीटी व्यासपीठ असून, त्यावर भारतातील सर्व प्रमुख भाषांमधील कार्यक्रम सादर होणार आहेत. त्याद्वारे तो ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’ म्हणून खऱ्या अर्थाने नावारूपाला येत आहे. हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने भारताचे ओटीटी बनणार असून, त्यावर हिंदीबरोबर मराठी, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपट व मालिका सादर होणार आहेत.


हेही वाचा :


Naam Ghyav Vitthal : 'नाम घ्यावं विठ्ठल' या गाण्याद्वारे विठुरायाला भावनिक साद, वारीनिमित्ताने श्रीजीत गायकवाडकडून सांगितीक भेट!


Entertainment News Live Updates 9 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या