Shivkumar Subramaniam : अभिनेते आणि पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम (Shiv kumar Subramaniam) यांचे निधन झाले आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या शिव ने परिंदा आणि हजारों ख्वाहिशों ऐसी (2005) या चित्रपटांची पटकथा शिव सुब्रमण्यम यांनी लिहिली आहे.
शिव यांनी परिंदा, प्रहार, द्रोहकाल, कमीने, 1942 अ लव स्टोरी, मीनाक्षी सुदरेश्वर, हिचकी, बँगिस्तान, रॉकी हँडसम, उंगली, 2 स्टेट्स, रिस्क या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच मुक्तिबंधन या मालिकेमध्ये देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली.
दोन महिन्यांपूर्वी शिव सुब्रमण्यम यांच्या मुलाचे निधन झाले होते. याबाबत बिना सरकार यांनी ट्वीट शेअर केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'हे ऐकून खूप दु:ख झालं. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलाचे ब्रेन ट्यूमरमुळे निधन झाले होते. '
गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटामध्ये देखील शिव सुब्रमण्यम यांनी प्रमुख भूमिका साकारली.
हेही वाचा :
- Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : रणबीरची होणारी 'दुल्हनिया' आलियाकडे भारताचं नागरिकत्व नाही; मुंबईत जन्म पण...
- Dasvi Twitter Review : अभिषेक बच्चनच्या ‘दसवीं’ला प्रेक्षकांनी केलं ‘पास’! सोशल मीडियावरही चित्रपटाची हवा!
- Happy Birthday Rohini Hattangadi : हा तर योगायोगच! पडद्यावर ‘कस्तुरबा’ साकारणाऱ्या रोहिणी हट्टंगडींचं खऱ्या आयुष्यातही गांधींशी खास कनेक्शन!