Actor Lalit Prabhakar : "मी स्वभावाने थोडासा बंडखोर आहे. लहानपणापासूनच माझी ती वृत्ती आहे. मी नास्तिक झालो ते कुणाच्या प्रभावामुळे नाही, तर शालेय काळात काही गोष्टी वाचल्यानंतर मला प्रश्न पडू लागले. तिथूनच माझ्या विचारप्रक्रियेची सुरुवात झाली. मला जाणवू लागलं की मी का एखादी गोष्ट करू? त्या गोष्टीमुळे नक्की काय साध्य होईल? प्रश्न विचारण्याची ही सवय तिथून लागली", असं अभिनेता ललित प्रभाकर (Actor Lalit Prabhakar) म्हणाला. तो मिर्ची मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. ललित प्रभाकर (Actor Lalit Prabhakar) सध्या त्याच्या आरपार या सिनेमामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 

Continues below advertisement

ललित प्रभाकर (Actor Lalit Prabhakar) म्हणाला, "फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून मी गोष्ट करत नाही. पण जर त्यामागचं कारण समजावून सांगितलं, तर मी नक्की ते करतो. काम करतानाही माझा हा दृष्टिकोन असतो. मला वाटतं की एखादी गोष्ट करण्यामागचं कारण समोरच्याने स्पष्ट केलं पाहिजे."

पुढे बोलताना ललित प्रभाकर (Actor Lalit Prabhakar) म्हणाला, "माझ्या मते, स्वातंत्र्य ही मोठी जबाबदारी आहे. अजून पूर्णपणे ते आत्मसात करता आलं नाही, कारण सोयीनं ते टाळलं जातं. आपण अनेकदा आपल्या सोयीच्या चौकटीत काही गोष्टींना ‘फ्रीडम’ म्हणतो, पण मी मात्र स्वतःला जास्तीत जास्त मोकळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या स्वतःच्या व्याख्यांनी मी स्वतःलाच मर्यादा घालू इच्छित नाही. नवीन शिकण्यासाठी, बदल स्वीकारण्यासाठी मला बंधनं नकोत. म्हणून मी कधीच स्वतःला अडकवून घेत नाही."

"संस्थेत काम करताना मी पहिला असेन, ज्याने सांगितलं की मला बाहेरच्या संस्थांमध्येही काम करायचं आहे. कारण मला वाटतं की, सतत एका ठराविक चौकटीत काम करणं योग्य नाही. मला मर्यादा नकोत, तर आणखी संधी आणि शक्यता शोधायच्या आहेत. त्यासाठी जितकं मोकळं राहता येईल तितकं राहणं गरजेचं आहे.", असंही प्रभाकरने (Actor Lalit Prabhakar) स्पष्ट केलं. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

VIDEO : रमैय्या वस्तावैय्या सिनेमातील रामचं रुपडं बदललं, सिनेक्षेत्र सोडल्यानंतर वजन वाढलं, आता ओळखणेही झालंय कठीण!

IMDb वर 7.1 रेटिंग, अंगावर काटा आणणारी स्टोरी, 50 मिनीटानंतर येतो ट्वीस्ट; सिनेमाची तुफान चर्चा