Ramaiya Vastavaiya fame Girish Kumar : बॉलीवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत जे पहिल्याच चित्रपटातून लोकप्रिय झाले, मात्र नंतर त्यांनी इंडस्ट्रीला अलविदा केला. अगदी तसाच एक अभिनेता म्हणजे गिरीश कुमार. पहिल्याच चित्रपटातून  गिरीश कुमार याने प्रेक्षकांची पसंती मिळवली, पण कोणाला माहिती होतं की तो फक्त काहीच चित्रपट करेन. गिरीश कुमार यांनी रमैया वस्तावैय्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र आता ते अभिनयापासून दूर असून त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे. त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये मोठे बदल झाले आहेत.

Continues below advertisement


रमैया वस्तावैयामध्ये गिरीशचा चॉकलेट बॉय लूक होता. पहिल्याच चित्रपटातून त्यांनी इंडस्ट्रीत आपली छाप पाडली होती. पण त्यांनी जास्त चित्रपट केले नाहीत आणि इंडस्ट्री सोडून थेट बिझनेसमन झाले. अलीकडेच ते दिसले, जिथे त्यांचं वाढलेलं वजन पाहून त्यांना ओळखणं अवघड होतं. स्वतः गिरीशही आपल्या वजनाकडे इशारा करताना दिसले.




गिरीशला ओळखणं झालं अवघड


गिरीश कुमार बांद्र्यात स्पॉट झाले. त्यांनी गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम घातली होती. त्यांचा लूक साधा होता, पण सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या वाढलेल्या वजनाने. गिरीश थोडे जाड झालेले पाहायला मिळत आहेत.  त्यामुळे त्यांना ओळखणं कठीण जात होतं. त्यांच्या या व्हिडिओवर लोकांनी भरपूर कमेंट्स केल्या. कुणी लिहिलं – "खरंच सांगितलं की बॉडी कमी करतोय." तर कुणी लिहिलं – "कुठे गेले ते दिवस." आणखी एकाने लिहिलं – "हे खूप क्युट आहेत. रमैया वस्तावैया माझा फेवरेट चित्रपट आहे."


करोडोंचा मालक आहे गिरीश कुमार 


गिरीश कुमार हे चित्रपट निर्माते एस. तौरानी यांचे सुपुत्र आहेत. एस. तौरानी हे इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील मोठी कंपनी टिप्स इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. गिरीशने जेव्हा अभिनय सोडला, तेव्हा त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय जॉइन केला. सध्या ते टिप्स इंडस्ट्रीजचे सीओओ आहेत. कंपनीची मार्केट कॅपिटल तब्बल 10,157 कोटी आहे. रिपोर्ट्सनुसार गिरीश कुमार यांची नेटवर्थ सुमारे 2,164 कोटी रुपये आहे.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


2 लग्न 5 मुलं, अमिताभ बच्चन ज्यांना 'सर' म्हणायचे, 700 सिनेमात काम करणारा व्हिलन एका दुर्घटनेने बनला दारुडा


500 किंवा 700 रुपये नाही, विकेंडला केवळ 200 रुपयांत सिनेमाचे तिकीट मिळणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय