Thriller Film : काही दमदार चित्रपटांच्या कथा प्रेक्षकांना चकित करून सोडतात. अशाच एका चित्रपटाने आजकाल ओटीटीवर सध्या मोठी लोकप्रियता मिळवली आहे. ओटीटीवर सध्या 2025 मधील एक चित्रपट धुमाकूळ घालत आहे. 50 मिनिटांनंतर या चित्रपटाची कथा पूर्णपणे बदलते आणि तो थ्रिलरमध्ये रूपांतरित होतो. आयएमडीबीवर देखील या चित्रपटाला 7 पेक्षा जास्त रेटिंग मिळाली आहे सुरुवातीला साधा वाटणारा हा चित्रपट 50 मिनिटांनंतर पूर्णपणे थ्रिलरमध्ये बदलतो. . आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे 'सूत्रवाक्यम'.
'सूत्रवाक्यम' हा मल्याळम भाषेतला जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून यात शाइन टॉम चाको यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्या सोबत दिव्या एम. नायर, मीनाक्षी माधवी, विंसी अलोशियस, दीपक परमबोल, अर्जुन अशोक आणि नसीफ यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसतात.
या चित्रपटाची कथा एका शाळा आणि जवळच्या पोलीस स्टेशनभोवती फिरते. अभिनेता शाइन टॉम चाको यांनी पोलीस अधिकारी क्रिस्टो जेव्हियर यांची भूमिका केली आहे, जो शालेय मुलांना आपल्या कामासोबतच पोलीस स्टेशनमध्येच ट्युशन देखील शिकवतो.
कथा जसजशी पुढे सरकते तशी ती अधिक गंभीर होत जाते. एका भावाने आपल्या बहिणीला मारहाण केली कारण त्याने तिला शाळेतील एका मुलाशी बोलताना पाहिले. ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये येते आणि मग क्रिस्टो जेव्हियर त्या भावाला कडक समज देतो.
सुरुवातीला साधा वाटणारा हा चित्रपट 50 मिनिटांनंतर एका व्यक्तीच्या गायब होण्यामुळे वेगळे वळण घेतो. त्यानंतर कथा प्रचंड सस्पेन्स आणि थराराने भरलेली होते. 'सूत्रवाक्यम'च्या क्लायमॅक्समध्ये धक्कादायक उलगडा होतो आणि दोन जणांचा खून झाल्याचे समजते.
सध्या हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत असून शाइन टॉम चाको यांचा 'सूत्रवाक्यम' नुकताच अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे आणि काहीच वेळात टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये पोहोचला आहे.
सध्या हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील देशातील टॉप 10 लिस्टमध्ये सहाव्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. सुरुवातीला 'सूत्रवाक्यम' पहिल्या क्रमांकावर होता. जर तुम्ही अजून हा चित्रपट पाहिला नसेल, तर प्राइम व्हिडिओवर तुम्ही तो हिंदी भाषेतही पाहू शकता.
शाइन टॉम चाको यांचा 'सूत्रवाक्यम' हा चित्रपट यूजिन जोस चिरामेल यांनी दिग्दर्शित केला असून त्यांनीच रेजिन एस. बाबू यांच्यासोबत मिळून तो लिहिला आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 7.1 रेटिंग मिळाली आहे. वीकेंडला हा चित्रपट पाहणे ही एक उत्तम निवड ठरू शकते.