Anaya Banger On Private Part Change Operation : रिअॅलिटी शो राइज अ‍ॅन्ड फॉल (Rise And Fall) सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सलमान खानचा लोकप्रिय शो बिग बॉसलादेखील हा शो जबरदस्त टक्कर देतो आहे. या शोमधील स्पर्धक एवढा मसाला देत आहेत की प्रेक्षकांची नजर स्क्रीनवरून हटतच नाही. पवन सिंगपासून अर्जुन बिजलानीपर्यंत अनेक नामांकित सेलेब्सनी या शोमध्ये धमाल उडवली आहे.

आरुषचे अनयाला अश्लील प्रश्न (Anaya Banger On Private Part Change Operation)

अलीकडेच या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आरुष (Aarush) अनया बांगरच्या (Anaya Bangar) मुलगा ते मुलगी होण्यासाठी झालेल्या सर्जरीबाबत प्रश्न विचारताना दिसतो. मात्र प्रश्न विचारताना तो सर्व मर्यादा विसरल्यासारखा वागतो. त्याचे प्रश्न ऐकून अनयालाही अस्वस्थ वाटल्याचे स्पष्ट दिसते.

सोशल मीडियावर व्हायरल (VIDEO Viral on social media)

व्हायरल व्हिडीओमध्ये आरुष अनयाच्या प्रायव्हेट सर्जरीबाबत बोलतो. पण हळूहळू त्याचे प्रश्न अधिकच अश्लील आणि बेशरम होत जातात. अखेर त्याने असे काही बोलले जे बोलणे टाळायला हवे होते. त्यावर अनया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणते, “असं नको बोलूस”. पण तरीसुद्धा आरुषचे प्रश्न थांबत नाहीत. अनया मात्र नंतर ते सगळे हसत हसत टाळून जाते. या व्हिडीओवर सोशल मीडियावरून लोकांकडून प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी आरुषला फटकारले तर काहींनी अनयाचे संयमाचं कौतुक केले.

अनाया बांगर कोण आहे? (Who is Anaya Bangar?)

अनाया बांगरचा जन्म 26 डिसेंबर 2000 रोजी मुंबईमध्ये झाला. ती माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचं अपत्य आहे. तिचं आधीचं नाव आर्यन बांगर होतं. बालपणापासून ती एका वेगळ्या ओळखीचा शोध घेत होती, स्वतःची खरी ओळख म्हणून तिला स्त्री म्हणून जगायचं होतं.

अनाया यांचं शिक्षण मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेत झालं आणि नंतर तिनं रिझवी कॉलेजमधून वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतलं. क्रिकेटमध्ये गाढ रुची असलेली अनाया बालवयापासूनच क्रिकेट खेळत होती. इस्लाम जिमखाना येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अनायाने यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबत मैदान गाजवलं होतं. तिच्या क्रिकेट कौशल्यामुळे विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंकडूनही तिला मार्गदर्शन मिळालं.

हे ही वाचा - 

IND vs PAK Live Streaming Asia Cup 2025 : विराट, रोहित, बाबर अन् रिजवान शिवाय भिडणार भारत-पाक! येथे LIVE पाहता येईल मॅच, जाणून घ्या A टू Z अपडेट्स