Kiran Mane Social Media Post On Dharmaveer 2 :  शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारीत असलेला 'धर्मवीर' चित्रपट प्रचंड गाजला होता. आता, या चित्रपटाचा सिक्वेल 'धर्मवीर-2' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'धर्मवीर-2' मध्ये आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला होता. बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेदेखील (Salman Khan) या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावरून अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते किरण माने (Kiran Mane) यांनी राजकीय फटकेबाजी केली आहे. 


किरण माने हे सोशल मीडियावर विविध मुद्यांवर भाष्य करत असतात. सामाजिक-राजकीय मुद्यांवर सोशल मीडियावर किरण माने मते मांडत असतात. किरण माने यांनी धर्मवीर-2 च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये सलमान खानचा उल्लेख केला आहे. 


किरण माने यांनी काय म्हटले?


सोशल मीडियावर किरण माने यांनी म्हटले की, “छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांचा आदर करणारं हिंदुत्व शिकवलंय आपल्याला. हिंदुत्व म्हणजे मुस्लीमद्वेष नव्हे.” हे पटत नव्हतं ना? हा घ्या ढळढळीत पुरावा… ‘हिंदुत्वाची गोष्ट’ सांगणार्‍या सिनेमाच्या प्रमोशनला सुद्धा वन ॲन्ड ओन्ली, ‘द सलमान खान’ हा अस्सल पठाण लागला! भारी वाटलं. धर्म ठेकेदारांना सलमानभाईच्या मागेपुढे करताना बघून लै लै लै भारी वाटलं,” अशी  राजकीय टोलेबाजी करणारी पोस्ट किरण माने यांनी केली आहे. 



‘धर्मवीर 2’ चा ट्रेलर लाँच कार्यक्रम 20 जुलै रोजी पार पडला. या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar), सलमान खान (Salman Khan), अशोक सराफ (Ashok Saraf), अभिनेते जीतेंद्र, बोमन इराणी (Boman Irani), गोविंदा (Govinda) आदी कलाकारांनी हजेरी लावली होती. या ट्रेलर लाँच उल्लेख करत किरण माने यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. 






इतर महत्त्वाच्या बातम्या :