Mr. Bean Actor Rowan Atkinson Viral Photo Fact Check : 'मिस्टर बीन' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता रोवन ॲटकन्सन (Rowan Atkinson) यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. मागील काही दिवसांत रोवन ॲटकन्सन यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे रोवनच्या चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. 'मिस्टर बीन' हा आजाराने अंथरुणाला खिळला असल्याचे या फोटोत दिसून आले. 


'मिस्टर बीन' असलेला अभिनेता रोवन ॲटकन्सन यांचा आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेला फोटो आणि त्याच्यासोबत होत असलेला दावा फेक असल्याचे समोर आले आहे. फॅक्ट चेक करणारी टीम फॅक्ट क्रेस्केंडो यांनी व्हायरल होत असलेल्या फोटो मागील सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. अभिनेता रोवन ॲटकन्सन  हे आजारी असल्याचा कोणताही पुरावा, गोष्ट त्यांना आढळून आली नाही. 






कसे आहेत मिस्टर बीन?


फॅक्ट चेकच्या दरम्यान असे आढळून आले की, अभिनेता रोवन ॲटकन्सन यांनी 10 जुलै 2024 रोजी फॉर्म्युला वन रेसच्या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. या दरम्यान, 'मिस्टर बीन' रोवन हे पूर्णपणे फीट असल्याचे दिसून आले. त्यामुळे मिस्टर बीन हे आजाराने अंथरुणाला खिळले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पण, व्हायरल होत असलेला फोटो कोणाचा आहे,  तो फोटो कुठून घेण्यात आलाय, याची चर्चा सुरू झाली आहे.






व्हायरल होणाऱ्या फोटोचे सत्य काय?


रिव्हर्स इमेजने सर्च केल्यास असे आढळून आले की, ब्रिटीश माध्यम, द मिररच्या एका लेखासाठी हा फोटो वापरण्यात आला. हा लेख 'द मिरर'मध्ये 31 जानेवारी 2020 मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. फोटोतील ज्येष्ठ व्यक्तीचे नाव बॅरी बाल्डरस्टोन असे आहे. ही व्यक्ती खूपच आजारी होती आणि त्यानंतर आजारापणाने या व्यक्तीचे निधन झाले. या फोटोला एआयच्या मदतीने एडिट करण्यात आले आणि रोवन ॲटकन्सनच्या चेहऱ्याशी रिप्लेस केले. 


रोव्हन यांनी साकारलेले मिस्टर बीन ही व्यक्तीरेखा जगभरात आबालवृद्धांमध्ये कमालीची लोकप्रिय आहे. मिस्टर बीन या विनोदी व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :