Actor Darshan :  कन्नड सुपरस्टार दर्शन थूगुदीपाच्या (Darshan Thoogudeepa) अडचणीत आणखी वाढ होणार आहे. कारण एका चाहत्याच्या हत्येप्रकरणी या अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. त्यातच आता त्याचा मॅनेजर श्रीधर याने केलेल्या आत्महत्या प्रकरणामुळेही त्याच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिली आणि व्हिडीओ शूट केला होता. त्यामध्ये श्रीधरने त्याच्या आत्महत्येचं कारण देखील सांगितलं आहे. 


 कन्नड अभिनेता दर्शन सध्या रेणुका स्वामीच्या हत्येप्रकरणी सध्या तुरुंगात आहे. त्यातच आता आणखी एका गोष्टीचा सामना त्याला करावा लागणार आहे. दर्शनचा 39 वर्षीय मॅनजेर श्रीधर हा बंगळूरु येथील अनेकलजवळील दुर्गा फार्महाऊसमध्ये मृतावस्थेत सापडला होता. तो तिथेच काम करत होता. 


श्रीधरच्या आत्महत्येचं कारण काय?


रिपोर्ट्सनुसार, श्रीधरने मागील वर्षी एप्रिल महिन्यात विष पिऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक नोट लिहिली. तसेच त्याने एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. त्यामध्ये त्याने त्याच्या आत्महत्येचं कारण हे एकटेपणा असल्याचं सांगितलं होतं. तसेच त्याने त्या व्हिडिओ त्याच्या नातेवाईंकाना या प्रकरणाची सखोल चौकशी देखील करायला सांगितली होती. 


दर्शनचे इतर मॅनेजरही बेपत्ता


या घटनेनंतर दर्शनच्या टीमची आणखी चिंता वाढली. त्यातच त्याचा एक मॅनेजर मागील सात वर्षांपासून बेपत्ता आहे. त्याचा देखील शोध सुरु आहे. त्यामुळे आता पु्न्हा एकदा दर्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय. 


एकाच्या हत्येप्रकणी दर्शनला अटक


एका हत्येच्या प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेत्याला अटक करण्यात आली. 9 जून रोजी कामाक्षीपाल्या पोलिसांनी अभिनेता दर्शनविरोधात एफआयआर नोंदवला. त्यानंतर हत्या प्रकरणात त्याला म्हैसूर येथील त्याच्या फार्महाऊसमधून अटक करण्यात आली. 


दर्शनची  सिने कारकिर्द


दर्शनने 1997  मध्ये 'महाभारत' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनेता होण्यापूर्वी त्याने एक वर्ष प्रोजेक्शनिस्ट म्हणून काम केले आणि त्यानंतर सहाय्यक कॅमेरामन म्हणूनही काम केले. सुरुवातीला, दर्शन केवळ चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये दिसला, परंतु नंतर तो मुख्य अभिनेता म्हणून उदयास आला. आपल्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये 'नम्मा प्रीथिया', 'कलासिपल्य', 'गाजा' आणि 'सारथी' सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.                          


ही बातमी वाचा : 


Vasai Crime : पोलिसांचा आणि कायद्याचा धाक आहे का? मुर्दाड बघ्यांचं काय करायचं? वसई हल्ल्याप्रकरणी मराठी दिग्दर्शकाचे संतप्त सवाल