Exclusive : 1992 मध्ये रिलिज झालेल्या  'खुदा गवाह' चित्रपटाची शूटिंग एक महिनाभर अफगाणिस्तानच्या काबूल आणि मजार ए शरीफमध्ये झाली होती. यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी जेलर रणवीर सेठीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांनी एबीपी न्यूजसोबत एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसचे अनुभव आणि आताच्या तिथल्या स्थितीबाबत भाष्य केलं.  


विक्रम गोखले यांनी सांगितलं की, जेव्हा शूटिंगसाठी गेलो होतो त्यावेळी काबुल एअरपोर्ट वर उतरलो होतो. आम्ही एअरपोर्टवर 24 तास आधी वापरलेली 90 हून अधिक मिसाईल पाहिली होती.  शूटिंगच्या वेळी प्रत्येक कलाकाराला हत्यारबंद 2-2 बॉडीगार्ड्स दिले होते.  शूटिंग पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी गर्दी व्हायची. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी लोकं सुरक्षारक्षकांना मार देखील खायचे, असं गोखलेंनी सांगितलं.  


Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार


'खुदा गवाह' च्या शूटिंग वेळी  अफगानिस्तान सरकारने सुरक्षेचा पूर्ण बंदोबस्त केला होता. एवढंच नाही तर त्यावेळच्या सरकारने पूर्ण एका महिन्यासाठी  हवाई सुरक्षा देखील पुरवली होती. 


गोखले यांनी यावेळी अफगानिस्तानमधील काही लोकांसह सिनेमातील कलाकारांसोबतच्या एका कार्यक्रमाबद्दलही सांगितलं.  


अफगानिस्तानमधील खराब स्थितीमुळं कलाकारांना शूटिंगनंतर बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. मात्र तिथल्या हॉटेलमध्ये चांगलं जेवण न मिळल्यामुळं तिथल्या एका ढाब्यावर जाऊन जेवण केलं होतं, अशी एक आठवण देखील गोखले यांनी सांगितली. 


IN PICS : तालिबानने कब्जा केल्यानंतर आजच्या अफगाणिस्तानचे चित्र कसं आहे?


'खुदा गवाह' चे  निर्माते मनोज देसाई यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, अमिताभ बच्चन यांची इच्छा होती की खुदा गवाहची शूटिंग अफगाणिस्तानमध्ये व्हावी.  मनोज देसाई यांनी सांगितलं की, अमिताभ यांनी अफगाणिस्तान मध्ये या सिनेमाच्या शूटिंगसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी चर्चा देखील केली होती. त्यानंतर राजीव गांधी यांनी अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह यांच्याशी खूप चांगले संबंध होते. 


मनोज देसाईंनी सांगितलं की,  'खुदा गवाह' मध्ये बुजकशीचा सीन मजार-ए-शरीफमध्ये शूट केला होता. अमिताभ बच्चन यांच्या मते फिल्ममधील लुक खरा असावा यासाठी फिल्मचं शूटिंग  युद्धग्रस्त अफगानिस्तान मध्ये केली जावी. 


याची माहिती ज्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांनी मिळाली त्यावेळी त्यांनी मनोज देसाईंना चांगलंच झापून काढलं होतं. तसंच माझ्या मुलाला जर काही झालं तर तू भारतात येऊ नकोस, तिकडेच आत्महत्या कर असंही तेजी बच्चन यांनी मनोज देसाईंना म्हटलं होतं.  


श्रीदेवीच्या आईने देखील यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांची आई तेजी बच्चन आणि श्रीदेवीच्या आईला समजावलं होतं. सध्याच्या अफगाणिस्तानमधील स्थितीवर मनोज देसाई यांनी दु:ख व्यक्त केलं.