Amruta Khanvilkar : अभिनय क्षेत्रात काम करताना असे अनेक अनुभव येतात, जे ते त्यांच्या चाहत्यांसोबत अनेकदा शेअरही करतात. अनेक कलाकारांना आलेला स्वामींचा अनुभवही त्यातीलच एक. केदार शिंदे (Kedar Shinde), आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यासह अनेक कलाकार त्यांचे स्वामी अनुभव कायमच शेअर करत असतात. आज स्वामी प्रकट दिन असून आजच्या दिवशी देखील अनेक कलाकारांनी त्यांचे काही अनुभव शेअर केले आहेत. 


अभिनेत्री अमृता खानविलकर हीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल युट्युब चॅनवर असाच एक व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी अमृताने तिचा स्वामी अनुभव शेअर केला. तसेच तिने यावेळी तिच्या लहानपणीच्या देखील काही आठवणी सांगितल्या आहेत.


अमृताने सांगितला तिचा स्वामी अनुभव


'मी एक अभिनेत्री असल्यामुळे तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये काम करताना तुम्हाला 2-2 वर्ष काम मिळत नाही. त्यावेळी तुम्ही स्वत:साठी काय करता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ते करण्याचं बळ मला स्वामींकडून मिळतं. जेव्हा माझ्याकडे काही काम नसतं तेव्हा मी काय असते', हे मला स्वामींनी दाखवलं, असा अनुभव अमृता खानविलकरने सांगितला आहे. 


तेव्हा माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या - अमृता खानविलकर


पुढे बोलताना अमृताने सांगितलं की,  'मध्यंतरी मी आणि हिमांशु आमचं एक घर भाड्याने द्यायचा विचार करत होतो. पण का माहिती ते रेंटवर जातच नव्हतं. लॉकडाऊनमुळे त्या घराचा हफ्ता देखील आम्हाला खूप भारी पडत होता. एका पॉईंटला तो परवडतच नव्हता. त्यावेळी आम्ही ठरवलं की हे घर आपल्याला भाड्याने द्यायलाच हवं. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या थोडी मदत होईल. खूप लोकं येऊन ते घर बघत होते. पण ते घर काही केल्या भाड्याने जातच नव्हतं. त्यानंतर एक जोडपं आलं आणि त्यांनी दोन आठवड्यात सांगितलं की ठिक आहे आम्ही तुमचं घर घेतो. त्यावेळी आम्हाला थोडं बरं वाटलंय. त्याची प्रोसेस सुरु झाली, तिथे त्यांच्या बायकोला विचारलं की, तुम्हाला का आमचं घर घ्यावसं वाटलं. आम्ही एक-दीड वर्ष पाहत होतो, पण कुणी तयारच होत नव्हतं. तेव्हा त्यांच्या बायकोनं सांगितलं की, तुमच्या मंदिरात स्वामी समर्थांचा फोटो होता, तो फोटो पाहून घर घेतलं. मला त्यावेळी असं वाटत होतं, की आता स्वामी नाही आहेत माझ्याबरोबर, पण ज्याक्षणी त्यांनी मला सांगितलं तेव्हा माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या.' 


ही बातमी वाचा : 


Bhagyashri Mote : भाग्यश्री मोटेने विजयसोबतच्या नात्याला दिला पूर्णविराम, साखरपुड्यानंतर घेतला वेगळं होण्याचा निर्णय