अहिल्यानगर : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाहा किम जोंग उन (Kim Jong un) यांच्यासारखा हुबेहूब चेहरा असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अभिषेक बारहाते (Abhishek Barhate) याने मराठी टेलिव्हिजनवरील "चला हवा येऊ द्या" (Chala hawa yeu dya) मधून किम जोंग उनची भूमिका साकारत संपूर्ण महाराष्ट्राला हसवले आणि आता हिंदी टेलिव्हिजनमधून त्याने संपूर्ण देशाला खळखळून हसवले आहे. विशेष म्हणजे सुपर डान्सर (Super Dancer) आणि इंडियाज बेस्ट डान्सरच्या (India's Best Dancer) सेटवर जाऊन या नगरच्या किम जोंग उनने थेट गीता माँ (गीता कपूर) यांच्याशी मराठीत संवाद साधलाय. नगरच्या मातीतील या रांगड्या किम जोंग उनबद्दल जाणून घेऊयात...


उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन सारखी हेअरस्टाईल. त्याच्यासारखाच चेहरा आणि त्याच्या सारखंच चालणं. मात्र काही कोरियाचा किम जोंग उन नाही तर अहिल्यानगरच्या सोनई गावातील अभिषेक बारहाते. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या अभिषेक नाव सोनई गावात सोनई महोत्सव या कार्यक्रमातून अभिनयाची सुरुवात केली.  सोनाई येथील महाविद्यालयात शिकत असताना त्यांना अनेक नाटकात काम केली. हुबेहूब किम जोंग उन सारखा दिसायला असल्याने त्याला मराठी टेलिव्हिजनवरील "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमात संधी मिळाली त्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला हसवलं आणि आता हिंदी टेलिव्हिजन वरती देखील तो पोहोचला आहे. इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर यांच्यातील स्पर्धेच्या शो मध्ये अभिषेकला अभिनयाचे संधी मिळाली आणि हिंदी टेलिव्हिजन वरती देखील त्याने अस्सल नगरी भाषेत सादरीकरण केले.


विनोदी अभिनेता म्हणून कमावले नाव 


अभिषेकने सोनई महोत्सवातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. अतिशय ग्रामीण भागात असल्याने आपण कधी टेलिव्हिजनवर अभिनय करू असं देखील त्याला वाटलं नव्हतं. मात्र तू सोनई गावाला हसवू  शकतोस तर तू महाराष्ट्राला देखील हसवू  शकतोस असा विश्वास अनेकांनी त्याला दिला. अभिषेकचा प्रवास हा अतिशय खरतड आहे. शिक्षण घेत असताना तो एका कपड्याच्या दुकानात देखील काम करत होता. विशेष म्हणजे तो ज्या कपड्याच्या दुकानात काम करत होता, त्या कपड्याच्या दुकानाचे उद्घाटन हे मराठीतील विनोदवीर सुप्रसिद्ध कलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते. त्याच दुकानात काम करून पुढे अभिषेकने आता विनोदी अभिनेता म्हणून नाव कमावले आहे. त्याचा अभिमान वाटत असल्याचे दुकानदार सांगतात.


जाहिरातीसाठी देखील ऑफर


किम जोंग उन सारखा दिसत असलेल्या अभिषेकला आता वेगवेगळ्या जाहिरातीसाठी देखील ऑफर मिळू लागल्या आहेत. अनेक हिंदी आणि मराठी सिरीयलसाठी त्याची मागणी होताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याची नगरी भाषा ही संपूर्ण देशातील प्रेक्षकांना आवडत आहे. अंगी कलागुण असेल तर आपण खेडेगावातून आलो आहोत की शहरातून, आपली भाषा कोणती ? याचा कोणताही फरक पडत नाही. नगरचा हा किम जोंग उन आता सज्ज आहे देशाला हसवायला. त्याच नगरी भाषेत.


आणखी वाचा 


Allu Arjun Bail : झुकेगा नही साला! न्यायालयीन कोठडी मिळताच तासाभरात अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर