Maharashtra Goverment मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या (15 डिसेंबर) भाजपचे 21, शिवसेनेचे 12 राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी 11 किंवा 4 वाजता शपथविधी होईल.
शपथविधी सोहळ्याची राजभवनात तयारीला सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्येही पाऊण तास चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन-
महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली होती . या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे . पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे . यंदा आमदारांच्या बैठक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले असून डिजिटल आसन व्यवस्था करण्यात आली आहे .
बबनराव लोणीकर मंत्रिपदासाठी इच्छुक-
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मंत्री पदासाठी पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त केली असून, नक्की कोण मंत्री होईल हे देव आणि देवेंद्रलाच माहिती असं म्हणत बबनराव लोणीकर यांनी, काहीजण मुंबई आणि दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचा देखील दावा केला आहे. मंत्रिपद मिळाव म्हणून आपण पक्षाकडे अपेक्षा व्यक्त केली असून, भाजपमध्ये चाळीस वर्ष मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले असल्याच देखील त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या खालील मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती-
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभूराजे देसाई
गुलाबराव पाटील
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाठ
भरत गोगावले
आशिष जयस्वाल
योगेश कदम
विजय शिवतारे
आबिटकर किंवा यड्रावकर
संबंधित बातमी:
Maharashtra Goverment मोठी बातमी! संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
Maharashtra Goverment मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्ताराचं ठिकाण बदललं; आता नागपुरात शपथविधी, वेळही ठरली